आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोकाटेंच्या उमेदवारीमुळे एन-८ मध्ये प्रतिष्ठेची लढत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मागील वेळी झालेल्या मनपा निवडणुकीत सिडको एन-७, एन-८ मतदारसंघातून शिवसेनेच्या प्राजक्ता भाले यांनी राष्ट्रवादीच्या संगीता स्वामी यांचा ३०५ मतांनी पराभव केला. मात्र, आता विश्वनाथ स्वामी शिवसेनेत दाखल झाले. त्यामुळे शिवसेनेकडून तिकीट मिळवण्यासाठी मोठी रस्सीखेच आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे काशिनाथ कोकाटे या मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्यामुळे निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे.
यंदा आरक्षण बदलल्यामुळे हा वाॅर्ड सर्वसाधारणसाठी खुला झाला आहे. गेल्या वेळी प्राजक्ता भाले यांना १५०१ आणि राष्ट्रवादीच्या संगीता स्वामी यांना १२९८ मते मिळाली होती, तर मनसेच्या मनीषा सोहनी यांना ६७५, तर भाजपच्या बंडखोर उमेदवार संगीता मिरकर यांना ३२५ मते मिळाली होती. या निवडणुकीत काशिनाथ कोकाटे पक्षाकडून लढायचे की अपक्ष निवडणूक लढवायची, याचा कौल आजमावत आहेत.

वाॅर्डाची सीमारेषा : एन-७
आणि एन-८ असे दोन्ही भाग या वाॅर्डात येतात. देवगिरी बँक ते आझाद चौक ते सावरकर चौक, सावरक चौक ते बळीराम पाटील ते ओंकार गॅस एजन्सी, तसेच सनी हॉटेलपर्यंत हा वॉर्ड आहे.

मागील निवडणुकीत ६८ टक्के मतदान
गेल्या निवडणुकीत गणेशनगर वाॅर्ड क्रमांक ४० म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या वाॅर्डात ६८ टक्के मतदान झाले होते. एकूण ७२०० मतदानापैकी ४४०० लोकांनी मतदानाचा हक्क बजावला होता. या निवडणुकीत वाॅर्डातील जवळपास ४०० मतदान कमी झाले आहे. म्हाडा कॉलनी परिसरातील घरे बाजूच्या वाॅर्डाला जोडल्यामुळे ही संख्या कमी झाली आहे. त्यामुळे या वेळी ६८०० मतदार आहेत.

इच्छुक उमेदवार
भाजप : अमेय देशमुख, राजेश मिरकर, आदिनाथ घुगे, विजय सरोदे, नामदेव बेंद्रे
शिवसेना : विश्वनाथ स्वामी, मंगेश भाले, मकरंद कुलकर्णी, नंदू फुलारी
राष्ट्रवादी : काशीनाथ कोकाटे, अनुप भोसले