आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kranti Chouk Shiwaji Maharaj Statue Hight Issue At Aurangabad

शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची वाढवणार; प्रस्ताव सभेसमोर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या क्रांती चौकातील पुतळ्याची उंची वाढवण्यात यावी, अशी मागणी सदस्यांनी केली असून तसा अशासकीय प्रस्ताव शनिवारी ( 15 जानेवारी) होणार्‍या सर्वसाधारण सभेसमोर मान्यतेस्तव ठेवण्यात आला आहे.

राजू शिंदे, संजय चौधरी, समीर राजूरकर आणि रवी कवडे या सदस्यांनी हा अशासकीय प्रस्ताव ठेवला आहे. क्रांती चौकातीला हा पुतळा औरंगाबाद शहराची शान असून येथे उड्डाणपूल झाल्यापासून महाराजांचा पुतळा दृष्टीस पडत नाही. त्यामुळे पुतळ्याची उंची वाढवण्याची गरज असल्याचे या प्रस्तावात म्हटले आहे. यासाठी लागणार्‍या निधीलाही आत्ताच मान्यता देण्यात यावी अशी सूचना केली.