आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवगिरी किल्ल्याच्या चांद मिनाराइतका शहरातील तिरंगा स्तंभ झाला उंचच उंच!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - देवगिरी किल्ल्यात यादवांनी उभारलेल्या चांद मिनारची उंची २१० फूट असून तेवढ्याच उंचीचा ध्वजस्तंभ क्रांती चौकातील झाशीची राणी उद्यानातील काला चबुतऱ्यावर उभारण्यात आला आहे. हा स्तंभ बनवण्यासाठी दोन महिने लागले. तीन क्रेनच्या मदतीने तो उभारण्यात आला. त्यासाठी पाच तास लागले.
१८५७ च्या लढ्यात याच ठिकाणी तीन स्वातंत्र्यसैनिकांना इंग्रजांनी फासावर लटकवल्याची नोंद आहे. त्याचीच एक आठवण येथे काला चबुतरा उभारण्यात आला होता. त्यावर शहरातील सर्वात उंच ध्वज स्तंभ उभारला जात आहे. रविवारी वाळूज येथील बजाज कंपनीतून दोन दोन ट्रेलरच्या सहायाने सात तुकड्यातील स्तंभ आणून अगोदर तयार करण्यात आला. त्यानंतर त्याची उभारणी करण्यात आली.

असा उभारला गेला स्तंभ
चबुतरा स्तंभाची उंची २१० फूट आहेे. हा स्तंभ बजाज इलेक्ट्रिकल्स कंपनीने तयार केला असून त्यासाठी दोन महिने लागले. त्याचे वजन १७ टन असून सात तुकड्यांमध्ये तो विभागला आहे. स्तंभाचे आयुष्य वाढवण्यासाठी गॅल्व्हनाईज्ड आयर्नपासून तो तयार करण्यात आला आहे. गंज लागू नये यासाठी पॉलीयुरॅथीन पेंट देण्यात आला. स्तंभासाठी २१ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.

नऊ बाय नऊ मीटर स्तंभाचा पाया
जमिनीपासून २१० उंचीचा हा मनोरा विजयी ध्वजस्तंभ म्हणून ओळखला जाईल. त्याचा पाया १५ मीटर खोल असून सहा मीटर एसीसी सिमेंटचे रेडीमिक्स लोखंड टाकण्यात आले आहे. त्यावर नऊ बाय नऊ मीटरचे पिलर तयार केले आहेत. त्यावर पुन्हा साडेतीन बाय साडेतीन फुटाचा चबुतरा तयार करण्यात आला आहे. ध्वज चढवायचा, उतरवण्यासाठी लिफ्टसारखी अॅटोमॅटिक यंत्रणा बसवली आहे.
६० लाख रुपयांपर्यंत खर्च : स्तंभासाठी २१ लाख रुपये खर्च आला असून तो अद्यावत अशा यंत्रणांनी सज्ज असा आहे. एकूण कामांचा खर्च हा ६० लाख रुपये असेल. स्तंभ उभारणी करण्यात आली. उर्वरित कामेही लवकर करू असे राम भोगले यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...