आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Kranti Chowk Water Tank Slab Collapse Issue Aurangabad

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आठ दिवसांत टाकीवर टाकणार हलके छत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - क्रांती चौकातील ‘त्या’ सर्वात जुन्या टाकीचा स्लॅब खिळखिळा झाला असून येत्या आठ दिवसांत पर्यायी छत उभारणीचे काम मनपा हाती घेणार आहे. गर्डर आणि त्यावर फरशीसारखे साहित्य वापरून स्लॅबपेक्षा हलके छत तयार केले जाणार आहे. यासंदर्भात स्ट्रक्चरल इंजिनिअरच्या मताचा विचार करून निर्णय घेतला जाणार आहे.

दोन दिवसांपूर्वी क्रांती चौकातील 10 लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीच्या स्लॅबला भगदाड पडल्याचा प्रकार उघडकीस आला. या टाकीची दुरुस्ती करायची कशी, याबाबत गेल्या दोन दिवसांपासून हालचाली सुरू आहेत. बुधवारी शहर पाणीपुरवठा तज्ज्ञ समितीचे सदस्य डॉ. उमेश कहाळेकर यांनी टाकीची पाहणी केली. 30 मजुरांच्या साहाय्याने रात्री उशिरापर्यंत टाकीत पडलेले स्लॅबचे अवशेष बाहेर काढण्याचे काम सुरू होते. गुरुवारी स्ट्रक्चरल इंजिनिअर रवींद्र बाभुळे यांनी या टाकीची पाहणी केली. दुरुस्ती करताना नेमके काय करता येईल, यासाठी टाकीचे मोजमाप करून आणि तिची अवस्था पाहून निर्णय घेतला जाणार आहे. बाभुळे यांच्यासोबत कार्यकारी अभियंता एस. डी. पानझडे, उपमहापौर संजय जोशी होते.

दोन दिवस काम चालेल : या टाकीवर आता मोठा स्लॅब टाकणे अशक्य असून गर्डरचा वापर करून फरशीसारखा हलका पृष्ठभाग असणारे आवरण तयार करावे लागणार आहे. उपमहापौर म्हणाले की, स्ट्रक्चरल इंजिनिअर बाभुळे यांच्याकडून सूचना आल्यावर हे काम हाती घेतली जाईल. साधारणपणे आठ दिवसांत हे काम होईल. त्यासाठी किमान दोन दिवस ही टाकी रिकामी ठेवावी लागणार आहे. त्यामुळे अकरा वसाहतींचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येईल.