आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Krsipampa Power Connection Rs 135 Cr For Aurangabad Region

कृषिपंप वीज कनेक्शनसाठी औरंगाबाद परिमंडळाला १३५ कोटी रुपये मिळणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - राज्य सरकारने मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना वेळेत आणि मागेल त्याला वीज कनेक्शन देण्यासाठी हजार ३९ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यात औरंगाबाद-जालना परिमंडळासाठी १३५ कोटी रुपयांचा समावेश आहे.

वीज कनेक्शन मिळावे यासाठी शेतकरी रीतसर कोटेशन भरून अर्ज करतात, पण त्यांना वर्षानुवर्षे वीज कनेक्शन मिळत नाही. असे औरंगाबाद परिमंडळांत सुमारे हजार शेतकरी आहेत. विहीर, बोअरवेल, शेततळे, प्रकल्प, नदी, पाटबंधाऱ्यातून पाणी देण्याची व्यवस्था असूनही विजेअभावी शेतकरी नवनवीन पीक, उत्पादन घेऊ शकत नाहीत. दारिद्र्य आर्थिक संकटामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी राज्य सरकारने विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना कृषिपंपासाठी हजार ३९ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यामध्ये जालना ४३ कोटी आणि औरंगाबादला ९२ कोटी मिळणार आहेत. त्यापैकी ४० कोटी रुपयांच्या कामाला तातडीने मंजुरी देण्यात आली आहे. यातून प्रलंबित अर्ज निकाली काढण्यात येऊन मागेल त्याला वेळेत वीज कनेक्शन देण्याचा अभिनव निर्णय सरकारने घेतला आहे.

कामे निकाली काढू

- वीज कनेक्शनसाठी लागणाऱ्या एलटी, एसटी वाहिन्या, विद्युत खांब, डीपी, सर्व्हिस वायर आदी आवश्यक कामे तातडीने पूर्ण करून शेतकऱ्यांना वीज कनेक्शन दिले जाणार आहे. औरंगाबादमध्ये १७०० आणि जालना जिल्ह्यातील हजारांवर प्रलंबित अर्ज तातडीने निकाली काढले जाणार आहेत. १३५ कोटींपैकी ४० कोटींच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. अधिक माहितीसाठी ७८७५७६४१४४ ७८७५७६६६५२ या क्रमांकावर नाव नोंदवावे. सतीशचव्हाण, मुख्यअभियंता, औरंगाबाद परिमंडळ.