आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

साधुग्रामसाठी तात्पुरत्या जागेकरिता प्रस्ताव; अधिकारी नियुक्ती व शासन निर्णयानंतर होणार कार्यवाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक -सिंहस्थ कुंभमेळ्यास वर्षाचा कालावधी राहिलेला असताना साधुग्रामच्या जागेचा प्रश्न सुटलेला नसल्याने प्रशासनाने तात्पुरत्या स्वरूपात साधुग्राम बांधण्यासाठी जागा अधिग्रहित करण्याचा निर्णय घेऊन प्रस्ताव शासनाला सादर केला आहे. शासननिर्णयानंतर जागा अधिग्रहणाची कार्यवाही सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. कुंभमेळ्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात साधुग्राम बांधण्याकरिता महापालिकेने निवड केलेल्या 323 एकर क्षेत्रापैकी 54 एकर क्षेत्र संपादित केले आहे. उर्वरित क्षेत्रात साधुग्राम आरक्षण बदलाचा प्रस्ताव कार्यान्वित आहे. राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली यापूर्वीच्या बैठकीत टीडीआरद्वारे साधुग्रामसाठी जागा ताब्यात मिळाली नाही, तर तात्पुरत्या स्वरूपात अधिग्रहण कार्यवाहीच्या निर्णयानुसार प्रशासनाने शासनास प्रस्ताव सादर केला आहे. जागा अधिग्रहण दि. 1 नोव्हेंबर 2014 ते डिसेंबर 2015 या कालावधीसाठी केली जाणार आहे.
निर्णयाचा पुनरावृत्ती : सन 2003 मध्ये कुंभमेळ्यासाठी साधुग्राम उभारणीसाठी नाशिक शिवारातील स. नं. 326 पैकी साधुग्रामसाठी सुमारे 6300 चौ. मी. क्षेत्राला वर्षभरÞाच्या कालावधीसाठी शासनाने मंजुरी दिली होती. जमिनीचा भाडेपट्टा, नुकसानभरपाई निश्चितीसाठी सक्षम प्राधिकारी नियुक्तीस जिल्हाधिकार्‍यांना अधिकार दिले होते.
अधिग्रहणातील अडसर
तात्पुरत्या स्वरूपात जमीन अधिग्रहणाची कार्यवाही जमीन मुंबई अधिग्रहण कायदा 1948 च्या तरतुदीनुसार करावी लागणार आहे. त्यासाठी कायद्याच्या कलम 8 ब नुसार सक्षम प्राधिकारी यांची नेमणुकीची गरज आहे. जिल्हा प्रशासनाने जमीन अधिग्रहणाची कार्यवाही करण्यासाठी प्रस्तावाद्वारे शासनाकडे प्राधिकार्‍याच्या नेमणुकीची मागणी केली आहे. शासनाकडून सक्षम प्राधिकार्‍यांच्या नेमणुकीनंतर जागा अधिग्रहणाची कार्यवाही करून जमीनमालकांना भाडे अदा केले जाणार आहे. कुंभमेळा आराखड्यात साधुग्रामसाठी सुमारे 80 कोटी रुपयांची तरतूद आहे.