आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kya Jamana Tha Club Anniversary Issue At Aurangabad

तुझे चाँद के बहाने देखूं, तू छत पर आजा गोरिये!!!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शिट्टय़ा, टाळ्यांच्या साथीने जीवनाचा धमाल अनुभव आज तापडिया नाट्यमंदिरात अनेकांना आला. तरुणपणीचा रोमांच पुन्हा एकदा अनुभवावयास देणारा विलक्षण सोहळा होता, आजी-आजोबांच्या धमाल डान्सचा. या वेळी चिअरअप करायला समोर होती मित्रमंडळी, बच्चे कंपनी आणि परिवार. ‘तुझे चाँद के बहाने देखूं, तू छत पे आजा गोरिये’सारख्या धमाल उडत्या चालीच्या गाण्यांवर ताल धरत ज्येष्ठांनी रंगमंचावर अधिपत्य गाजविले. तरुणपणीच्या अनेक आठवणी जशाच्या तशा अनेकांनी या वेळी ताज्या केल्या.
‘क्या जमाना था क्लब’च्या दुसर्‍या वर्धापन दिनाचा हा कार्यक्रम कुठल्याही अवॉर्ड फंक्शनपेक्षा कमी नव्हता. सर्वच ज्येष्ठ सेलिब्रिटींच्या आविर्भावात वावरत धमाल करत होते. हा विलक्षण सोहळा औरंगाबादकरांना दिलासा देणारा होता.