आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लेबर कॉलनी पाडून सरकारी कार्यालये, क्वार्टर्स बांधणार; सा.बां. विभागाच्या मुख्य अभियंत्यांची माहिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील शहरातील सर्वात जुनी सरकारी इमारतींची कॉलनी येत्या दोन वर्षांत टप्प्याटप्प्याने पाडून तेथे सरकारी कार्यालयांचे संकुल व उर्वरित जागेत शासकीय निवासस्थाने होणार आहेत, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता एम. एम. सुरकुटवार यांनी दिली. 
 
गुरुवारी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी औरंगाबाद विभागाचा आढावा घेतला. पत्रकारांना या मीटिंगची माहिती द्या, सोबत पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनही द्या, असे आदेश त्यांनी निघताना मुख्य अभियंत्यांना दिले.
 
त्यामुळे गेल्या वीस वर्षांत या विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी प्रथमच सा.बां. विभागाच्या योजना पत्रकारांशी संवाद साधून सांगितल्या. यात लेबर कॉलनीचे काय होणार, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, ही सरकारी कॉलनी येत्या दोन वर्षांत टप्प्याटप्प्याने पाडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, त्याचा आराखडा व पुढील खर्च याबाबत निर्णय बाकी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.    
 
सरकारी कार्यालयांचे संकुल होणार..    
ही कॉलनी टप्प्याटप्प्याने दोन वर्षांत पाडली जाऊन तेथे सुरुवातीच्या टप्प्यात सरकारी कार्यालयांचे संकुल, नंतर त्यामागे कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने करण्याचा शासनाचा विचार आहे. हे सर्व काम सार्वजनिक बांधकाम विभाग लवकरच हाती घेण्याच्या विचारात असल्याची माहिती मुख्य अभियंत्यांनी दिली. 

जालना रोड अजूनही सा.बां.कडेच...   
शहरात सा.बां. विभागाचे मोठे पाच रस्ते आहेत. जालना रोडचे काम नेमके कोण करणार आहे? एनएचआय (राष्ट्रीय रस्ते विकास विभाग)चे काम कुठवर आहे? या प्रश्नावर सुरकुटवार म्हणाले की, हा रस्ता अजूनही सा.बां. विभागाकडेच आहे. तो अजून एनएचआयकडे हस्तांतरित केलेला नाही. जेव्हा एनएचआयचे काम सुरू होईल तेव्हाच तो हस्तांतरित केला जाईल.
बातम्या आणखी आहेत...