आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मानवी सापळ्यांच्या अभावामुळे वैद्यकीय शिक्षणात अडचणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह खासगी वैद्यकीय महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मानवी सापळे किंवा हाडे उपलब्ध होत नसल्याने अभ्यासात अडचणी येत आहेत. शिक्षणासाठी दरवर्षी २०० मानवी सापळ्यांची आवश्यकता भासते, परंतु वर्षाला २५ ते ३० सापळेही मिळत नसल्याचे समोर आले आहे.
शरीररचना शास्त्राअंतर्गत: (अॅनाटॉमी)मानवी शरीराचा अभ्यास केला जातो. देहदानाच्या जनजागृतीमुळे अनेक मृतदेह वैद्यकीय महाविद्यालयाला मिळतात. या मृतदेहांवर रासायनिक प्रक्रिया (िडसेक्शन) करून त्यावर अभ्यास केला जातो. डिसेक्शननंतर हाडे काढणे शक्य आहे, मात्र या प्रक्रियेद्वारे प्राप्त हाडांचे सापळे तेलकट असतात. ते विद्यार्थ्यांना हाताळणे अडचणीचे जाते. तसेच रसायनांमुळे हाडांची झीजही मोठ्या प्रमाणात होते. बेवारस मृतदेहांवर ‘मॅसिरेशन’ (मृतदेह पाण्यात ठेवून) प्रक्रियेद्वारे मिळवलेले सापळे चांगल्या प्रतीचे असतात. ते दीर्घकाळ टिकतात.
घाटीत साधारणत: दरवर्षी १५० विद्यार्थी शिक्षण घेतात. दोन विद्यार्थी मिळून एक हाडाचा सापळा जरी आवश्यक धरला, तरी प्रत्येक वर्षाला २०० सापळ्यांची आवश्यकता भासते, परंतु सापळा मिळवण्याची कार्यप्रणालीच अनेक ठिकाणी नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे.
बोनबँक असणे गरजेचे : प्रत्येकमहाविद्यालयात बोन बँक असणे गरजेचे आहे. बोन बँकेमुळे विद्यार्थ्यांना हाडे उपलब्ध होऊन त्यांना अभ्यासात मदत होईल. मात्र, बोन बँकेला मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता भासते. खासगी महाविद्यालये मनुष्यबळ वाढवत नसल्याने अद्ययावत बोन बँकाही नाहीत.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, 'कृत्रिम' सापळ्यांचा त्रास...
बातम्या आणखी आहेत...