आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद: विद्यापीठात 10 विभागांचा कारभार चालताे केवळ दोनच शिक्षकांवर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- डाॅ. बाबासाहेब अांबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ४३ पैकी २५ शैक्षणिक विभागांमध्ये शिक्षकांची वानवा अाहे. या २५ पैकी ६ विभागांत एकही मान्यताप्राप्त शिक्षक नाही. ९ विभाग तर निव्वळ एका शिक्षकावर सुरू अाहेत.  मोठी विद्यार्थी संख्या असणारे १० विभाग जेमतेम दोन शिक्षकांवर सुरू अाहेत. दरम्यान, अधिकार मंडळे अाणि विद्यापीठ कायदा अस्तित्वात नसल्यामुळे जागा भरण्यात अाल्या नाहीत, असे कुलगुरु डाॅ. बी. ए. चोपडे यांचे म्हणणे आहे.
 
एकही मान्यताप्राप्त शिक्षक नसलेल्यांमध्ये पाली अँड बुद्धिझम विभागाचा समावेश अाहे. विशेष म्हणजे या विभागातील सर्वाधिक विद्यार्थ्यांना यूजीसीची फेलोशिप मंजूर होते. काळाची गरज अोळखून सुरू केलेला नॅनो टेक्नाॅलाॅजी विभाग, नृत्य, उपयोजित गणित, संगीत विभागाचा देखिल यामध्ये समावेश अाहे. नव्याने स्थापन केलेल्या फुले-अांबेडकर थाॅट्स विषयासाठीही अद्याप शिक्षकांची नेमणूक केली नाही. विद्यापीठात परकीय भाषा, जनसंवाद व वृत्तपत्रविद्या, भूगोल, प्रिंटिंग टेक्नाॅलाॅजी, ललित कला, मानसशास्त्र, संस्कृत, अनॅलिकिटल केमिस्ट्रीतही एकच शिक्षक कार्यरत अाहेत.

वनस्पतिशास्त्रात १७ पदे मंजूर; पण...
वनस्पतिशास्त्र विभागात १७ पेक्षा अधिक शिक्षकांची मंजूर पदे अाहेत. येथे मात्र विभागप्रमुखांसह आणखी एक शिक्षक  कार्यरत अाहेत. उर्दू, शारीरिक शिक्षण, पर्यटनशास्त्र विभागप्रमुखांकडे परीक्षा व मूल्यमापन विभागाचा अतिरिक्त कार्यभार अाहे. प्रौढ निरंतर विभागातही दोनच जण अाहेत.

संवैधानिक अधिकारीही प्रभारी
कुलगुरू अात्तापर्यंत कायम कुलसचिवांची नेमणूक करू शकलेले नाहीत. वित्त व लेखाधिकाऱ्यांकडे वित्त तर पर्यटन विभागप्रमुखांकडे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचा कार्यभार अाहे. क्रीडा, विद्यार्थी  विकास मंडळाच्या संचालकपदाचा कार्यभारही असाच अतिरिक्त आहे.

उस्मानाबाद उपकेंद्रातही तीच बोंब : तेथे इंग्रजी विभागात १, व्यवस्थापनशास्त्र-२, रसायनशास्त्र-२ अाणि सूक्ष्मजीवशास्त्र विषयातदेखील दोन जण अध्यापन करत अाहेत.
 
बातम्या आणखी आहेत...