आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lacking Fire Brigade Take 37 Life In Aurangabad District

औरंगाबाद जिल्ह्यात अग्निशामन केंद्रा अभावी 37 जण प्राणाला मुकले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- 50 हजार लोकसंख्येला एक अग्निशमन केंद्र असावे, असा अग्नी सुरक्षा विभागाचा नियम आहे. मात्र, औरंगाबाद जिल्ह्यात पैठण नगरपालिका, वाळूज आणि चिकलठाणा एमआयडीसी वगळता इतर ठिकाणी अग्निशमन केंद्रे नाहीत. जिल्ह्यातील आठ तालुक्यांत अग्निशमन केंद्र असती तर 1 एप्रिल 2012 ते 31 मार्च 2013 पर्यंत 37 जणांचे जीव वाचवता आले असते. कोट्यवधींची वित्तहानी टाळता आली असती.


जिल्ह्यात कोठेही आग लागली किंवा अपघात झाला तर औरंगाबाद महानगरपालिका अग्निशमन दलाला पाचारण करण्यात येते. 1 एप्रिल 2012 ते 30 मार्च 2013 पर्यंत आग लागल्याचे 70 फोन कॉल महानगरपालिकेला आले आहेत. मात्र, घटनास्थळ लांब असल्यामुळे अग्निशमन दलाला वित्त आणि जीवित हानी टाळण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. केंद्रे असलेल्या ठिकाणी पुरेसे अग्निशमन साहित्य नाहीत. परिणामी त्याचा ताण औरंगाबाद महानगरपालिकेच्या अग्निशमन दलावर पडतो.


दहा जीव वाचले, 82 कोटींची वित्तहानी टळली : अग्निशमन दलाने 1 एप्रिल 2012 ते 31 मार्च 2013 पर्यंत 82 कोटींची वित्तहानी वाचवली आहे. या एका वर्षाच्या कालावधीत 24 जणांचा आग व अपघातात मृत्यू झाला असून 10 जणांना वाचवण्यातदलाला यश मिळाले. अग्निशमन विभागाने वार्षिक अहवाल रविवार 14 एप्रिल रोजी सादर केला. अहवालानुसार वर्षभरात अग्निशमन विभागाला 602 फोन कॉल प्राप्त झाले असून 277 कॉल आग, 146 कॉल रेस्क्यू, पंपिंग 25, बंदोबस्त 53, शिडी 83, टेस्ट 5 आणि इतर 13 कॉल्सचा समावेश आहे. या कॉल्सची तातडीने दखल घेतल्यामुळे 82 कोटी 73 लाख 98 हजार 600 रुपयांची वित्तहानी टाळण्यात आणि 10 जणांचा जीव वाचवण्यातही अग्निशमन दलाला यश आले आहे. ही बाब गौरवस्पद असल्याचे सभापती विकास जैन यांनी
म्हटले आहे.


अहवालातून माहिती उघड
सिल्लोडनजीक विहिरीत बस कोसळून 30 जून 2011 रोजी 14 प्रवाशांचा मृत्यू झाला. पाडळी शिवारात 2 जुलै 2012 रोजी तीन जणांचा विहिरीत पडून प्राण गमवावे लागले. मुकुंदवाडीत गणपती विसर्जन विहिरीत तीन जणांचा मृत्यू झाला. वर्षभरात 23 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे, तर 36 कोटींपेक्षा अधिक वित्तहानी झाली आहे. या घटना जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या आहेत. येथे अग्निशमन केंद्रे नाहीत.


23 जणांचे प्राण वाचले असते
जिल्ह्यात अग्निशमन केंद्रे नसल्यामुळे अपघातांमध्ये 23 जणांना जीव गमवावा लागला. ही केंद्रे असती तर प्राण वाचवता आले असते. प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात अग्निशामक विभाग असावा, अशी मागणी विधिमंडळ अधिवेशनात केलेली आहे.
संजय शिरसाट, आमदार

लवकरच केंद्र सुरू होणार
*सिल्लोड, कन्नड, सोयगाव, गंगापूर, वैजापूर, खुलताबाद नरपालिकेत अग्निशमन केंद्रे सुरू करू त्यासाठी 4 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. दोन ते तीन महिन्यांत काम पूर्ण होईल, या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत.
जयंत दांडेगावकर, नगररचना अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय.