आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Lacking Of Bypass Aurangabad City No Takes Breath

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘बायपास’अभावी औरंगाबाद शहर गुदमरले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - पंधरा लाख लोकसंख्येकडे वाटचाल करणा-या ऐतिहासिक औरंगाबाद शहराला चारही बाजूंनी वळण रस्ते नसल्याने मधोमध जाणा-या जालना रस्त्यावरील वाहतुकीचा ताण असह्य झाला आहे. या मार्गावरून दररोज ये-जा करणा-या चाकरमान्यांचाही जीव रहदारीच्या कोंडीमुळे टांगणीला लागला आहे.

सकाळी वाळूज व चिकलठाणा औद्योगिक वसाहतींकडे जाणारी वाहने, दुपारी अवजड वाहने आणि सायंकाळी पुन्हा तसेच चित्र असते. त्यामुळे या रस्त्यावर कायम वाहतूक कोंडते. महावीर चौक, आकाशवाणी, सेव्हन हिल्स, जळगाव टी पॉइंट या ठिकाणी वाहतुकीची मोठी कोंडी होत असल्यामुळे अपघात आणि प्रदूषण वाढत चालले आहे. बीड बायपासदेखील शहराचाच भाग झाला असून, त्यावर एकमेव उड्डाणपूल असल्यामुळे वाहनांना शहराबाहेर पडणे अवघड झाले आहे. केंब्रिज शाळा ते हर्सूल सावंगी, हर्सूल सावंगी ते मिटमिटा, तिसगाव ते मिटमिटा हे बायपास झाले तर बाहेरगावी जाणारी 90 टक्के वाहने शहरात येणार नाहीत व जालना रोड वाहतुकीसाठी मोकळा होऊ शकेल.

असे आहे जालना रस्त्याचे वास्तव
50 हजार शहरात दररोज येणा-या वाहनांची संख्या
बायपास झाल्यास परगावाहून येणारी किमान 40 टक्के वाहने जालना रस्त्यावर येणारच नाहीत.
वर्ष 2012
68 अपघात
33 मृत्यू
अपघाती मृत्यूचे प्रमाण जवळपास 50 टक्के असून मृतांत दुचाकीस्वारांचा समावेश आहे. मोठ्या वाहनाला दुचाकी धडकून अपघात झाल्याचे पोलिसांकडील आकडे सांगतात.

दै. ‘दिव्य मराठी’च्या चमूने
या रस्त्यावरून प्रवास केला

*13 कि.मी. कारप्रवासाला 45 मिनिटे लागली.
*हे अंतर कापण्यासाठी फार तर 20 मिनिटे लागावयास हवीत.
*या काळात मोजून सात मालमोटारी येथून गेल्या. त्यात वाळू वाहणारे पाच टिप्पर होते.
*जप्ती टाळण्यासाठी त्यांनी हा मार्ग निवडला असावा. बाकीची दोन वाहने 20 चाकी होती.
बायपासचे अडले घोडे
केंब्रिज ते हर्सूल सावंगी
लांबी :13 किमी
रुंदी :60 मी.
*काही ठिकाणी भूसंपादन झालेले नसल्यामुळे काम रेंगाळले. नंतर ठेकेदारानेही ते थांबवले.
*मधल्या काळात खर्च वाढल्याने ठेकेदाराने पैसे वाढवून मागितले. बांधकाम विभागाला ते शक्य झाले नाही. त्यामुळे काम थांबले.
*आता उरलेल्या कामासाठी


25 कोटी रुपये खर्च अपेक्षित.
*13 किलोमीटर लांबीच्या या रस्त्यावर 9 पूल आहेत. पूल तेवढे सुस्थितीत असून, रस्त्यावर मात्र गुडघाभर खोलीचे खड्डे आहेत.
*अवजड वाहने वगळता कोणताही वाहनधारक या रस्त्यावरून प्रवास करण्याचे धाडस करू शकत नाही.
अपेक्षित खर्च
2006 10 कोटी
2013 25 कोटी
2006 मध्ये निविदा. 10 कोटींत हे काम होणार होते.


पुढे काय? ठेकेदाराने जास्तीचे पैसे मागत काम थांबवल्याने बांधकाम खात्याने नव्याने निविदा मागवल्या. खात्याने कोर्टात कॅव्हेट दाखल केले आहे. पुढील आठवड्यात निविदा उघडल्या जातील. किमान 25 कोटी खर्च अपेक्षित.


पहिल्या ठेकेदाराने काम अपूर्ण ठेवल्याने नव्याने निविदा मागवल्या आहेत. बहुतांश काम पूर्ण झाले असून, कार्यादेशानंतर 6 महिन्यांत रस्ता खुला होऊ शकतो. लवकर बायपास सुरू करण्याचा प्रयत्न आहे. व्ही. एल. दुबे, कार्यकारी अभियंता, सा.बां.