आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सप्ताहानिमित्त एकोप्यासाठी निवडणुकीवर बहिष्कार, अातापर्यंत एकही उमेदवारी अर्ज नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर- पावणे दोनशे वर्षांपूर्वीची सुरू असलेला सप्ताहाच्या परंपरेचा यंदा वैजापूर तालुक्यातील लाडगावला आयोजनाचा मान मिळाला अाहे. सप्ताहदरम्यान सदगुरू गंगागिरी महाराज अखंड सप्ताहामुळे तसेच गटातटाचे राजकारण होऊ नये, यासाठी कोणीही निवडणुकीत सहभाग न घेण्याचा निर्णय काही नेत्यांनी एकमताने घेतला आहे. सप्ताह गावाला जाहीर झाल्यापासून गावात वर्षभरापासून दारूबंदी देखील करण्यात आली असून निवडणुकांवर होणारा लाखोंचा खर्च वाचणार असल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

२० ऑगस्ट ते २७ ऑगस्ट दरम्यान सराला बेटाचे महंत रामगिरीमहाराज यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होणा-या या अखंड हरीनाम सप्ताह गावपातळीवर ग्रामस्थांनी एकजुटीच्या ताकदीतून दिमाखदार स्वरुपात पार पडण्याची जबाबदारी सप्ताह समितीने घेतली आहे. या अखंड हरीनाम सप्ताहाला गावात ४ ऑगस्ट रोजी होणारी ग्रामपंचायतीच्या
निवडणुकीत सत्ता संघर्षाच्या वादातून मतभेदाचे राजकारण होवू नये तसेच गावातील बंधूभाव, एकोपा टिकवण्यासाठी ग्रामपंचायत निवडणुकीत सहभागी न होण्याची एकमुखी भूमिका लाडगावच्या ग्रामस्थांनी घेतली. निवडणूक प्रशासनाने नामनिर्देशन पत्र स्वीकृती प्रक्रिया हाती घेतली असताना लाडगाव येथील ९ सदस्यीय ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गावातून एकाही व्यक्तीने उमेदवार अर्ज दाखल केला नसल्याचे विभागातील अधिक-यांनी सांगितले.
प्रबोधन करण्यासाठी सप्ताह : महंत रामगिरी महाराज
सदगुरू गंगागिरी महाराज यांनी सुरू केलेल्या अखंड हरिनाम सप्ताह परंपरेसंबंधी सांगितले की,भारत देश हा पारतंत्र्यात होता.त्यात मराठवाडा हा प्रदेश जुलुमी निझाम राजवटीत असल्याने गुलामीत आयुष्य जगणाऱ्या त्या काळात लोकांची उपासमार , शिक्षणाचा अभाव , व्यसनाधीनता याप्रकारामुळे समाज अस्वस्थ झाला होता.त्यामुळे भागवत सप्ताहाची परंपरा सदगुरू गंगागिरी महाराज यांनी हाती घेतली.या सप्ताहात लोकांना व्यसनमुक्त करणे , अन्न व कपडे दान करून नागरिकांना परमार्थाचा सन्मार्ग दाखविण्याची मोलाची भूमिका त्यांनी जोपासली आहे.तसेच गावाची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी बैठक घेतली असल्याचे त्यांनी सांगितले.

सप्ताहासाठी १६८ एकर जमीन दिली
वैजापूर तालुक्यात १५ वर्षांनंतर लाडगाव येथे अखंड हरिनाम सप्ताह आयोजनाची जबाबदारी गावाला लाभली आहे.त्यामुळे गावात सर्व नागरिक सप्ताहा दिमाखदार व थाटात साजरा करण्यासाठी एकवटले आहेत.परिसरातील १६८ एकर जमिनीवर शेतक-यांनी यावर्षी पीक पेरणी न करता सप्ताहाच्या कार्यक्रमासाठी जमीन उपलब्ध करून दिली आहे.
जागा रिक्त ठेवण्याचा निर्णय
गावात ४ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत गावपातळीवर संघर्ष होण्याची शक्यता असल्याने गावात बंधू भावाचा गोडवा टिकून राहण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी निवडणूक न करता ग्रामपंचायतीचे नऊ सदस्यपदाच्या जागा रिक्त ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे लाडगाव येथील माजी सरपंच काशिनाथ रक्ताटे , सय्यदसर , सुभाष सोमवंशी , बबन डोंगरे, रुस्तुम शेख , संतोष सोमवंशी , दिलीप सोमवंशी , सुनील वेलगुडे , अतुल वेलगुडे आदी ग्रामस्थ व सप्ताहा समितीने निर्धार केला आहे.या निर्णयाचे स्वागत शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रा.रमेश बोरनारे, माजी सभापती बाबासाहेब जगताप यांनी केले आहे.
बातम्या आणखी आहेत...