औरंगाबाद - चिकलठाणा येथील हनुमान मंदिराच्या पाठीमागे असलेल्या नाल्यात गुरुवारी तरुणीचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला. या घटनेमुळे चिकलठाण्यात खळबळ उडाली. या तरुणीचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळला असावा, अशी पोलिसांना शंका आहे. मृतदेह पूर्णपणे जळालेला असल्याने मृत तरुणीची ओळख पटू शकली नाही. हनुमान मंदिराच्या मागील बाजूस मोकळ्या जागेत दर शुक्रवारी आठवडी बाजार भरतो. या बाजार जागेला लागून असलेल्या नाल्याच्या काठी सकाळी च्या सुमारास पूर्णपणे जळालेला मृतदेह काही नागरिकांना आढळला. त्यांनी ही बाब पोलिसांना कळवल्यानंतर एमआयडीसी चिकलठाणा पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला.
खून करून जाळले
मारेकऱ्याने तरुणीचा इतर ठिकाणी खून करून तो नाल्याच्या काठी आणून जाळला असावा, असा पोलिसांना संशय आहे. रात्री उशिरापर्यंत मृत तरुणीची ओळख पटली नव्हती. सर्व बेपत्ता तरुणी, महिलांची माहिती एमआयडीसी सिडको पोलिसांनी शहरातील सर्व पोलिस ठाण्यांकडून मागवली आहे. मृत तरुणीची ओळखच पटली नसल्याने पोलिसांच्या तपासाला दिशा मिळालेली नाही. अनैतिक संबंधातूनच हा खून झाला असावा, असा संशय एका पोलिस अधिकाऱ्याने व्यक्त केला.
आईच्या काळजाचे पाणी
घटनेचीमाहिती दुपारपर्यंत राणीच्या आईला माहीत नव्हती. केवळ अपघात झाल्याचे सांगण्यात आले. राणीला काय झाले... तिचे पप्पा माझा फोन का घेत नाहीत. तिचा चेहरा विद्रूप झाला तरी प्लास्टिक सर्जरी करू, वाट्टेल तितका पैसा खर्च करू, अशी भाबडी आशा ती बोलून दाखवत होती. अखेर साडेपाचच्या सुमारास राणीचा मृतदेहच घरी आला तेव्हा या माउलीच्या काळजाचे पाणी झाले.