आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रणरागिणी पथकाची टवाळखोरांवर कारवाई,टारगट तरुणांची पथकाने केली धुलाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वैजापूर - शहरातील महाविद्यालयाच्या आवारात भटकणा-या टवाळखोर तरुणांना बुधवारी वैजापूर पोलिसांच्या रणरागिणी पथकाने चांगलाच हिसका दाखवला. या वेळी शहरातील दोन महाविद्यालयांसह बसस्थानक परिसरात जवळपास 25 ते 30 टारगट तरुणांवर या पथकाने प्रतिबंधक कारवाई केली. पोलिसांनी अचानक केलेल्या या कारवाईमुळे महाविद्यालयाच्या आवारात फिरणा-या टारगट तरुणांत खळबळ उडाली.


वैजापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बापूसाहेब महाजन, पोलिस उपनिरीक्षक श्रीनिवास भिकाने, नागेश टिपरसे, शरीफ तडवी, बाबासाहेब धनुरे, महिला पोलिस कर्मचारी सुजाता दांगट, सिंधू सिकतोडे, सरोज शेळके, वर्षा
गाडेकर यांच्या पथकाने साध्या गणवेशात विनायकराव पाटील महाविद्यालय, एमआयटी कॉलेज तसेच एसटी बसस्थानक परिसरात महाविद्यालयाचे विद्यार्थी नसलेले 25 ते 30 टवाळखोर तरुणांना पकडले. त्यांना मुलीसमोर उठबशा मारण्याची शिक्षा करून त्यांच्यावर या पथकाने प्रतिबंधक कारवाई केली.


पोलिस ओळखू आले नाहीत
महाविद्यालयात पोलिस कर्मचा-यांचे पथक साध्या वेशात दाखल झाले. महाविद्यालयाशी संबंधित नसताना आवारात घुटमळणा-या टारगट तरुणांना पोलिसांनी पकडले. त्यानंतर सुटकेसाठी पोलिसांच्या विनवण्या त्या मुलांनी केल्या. पुन्हा या कॉलेजात येणार नाही, अशी गयावया ती मुले करत होती.


टवाळखोर तरुणांची टोळी महाविद्यालयीन तसेच शाळकरी विद्यार्थिनींची छेडछाड करतात. त्यांच्या या छेडछाडीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी ही मोहीम राबवली आहे. यापुढेही कारवाई चालणार आहे.
बापूसाहेब महाजन, पोलिस निरीक्षक