आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lake News In Marathi, Salim Ali Lake Issue At Auranagabad, Divya Marathi

सलीम अली सरोवरातील सुशोभीकरणात मनपाचा अतिरेक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- सलीम अली सरोवरातील सुशोभीकरणाचे काम करताना मनपाने अतिरेक चालवल्याचा आरोप सलीम अली सरोवर संवर्धन समितीच्या सदस्यांनी केला आहे. उद्यानातील लाकडी प्लॅटफॉर्मची तब्बल नवव्यांदा रंगरंगोटी सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सलीम अली सरोवराचे सुशोभीकरण व जपानी गार्डनचा प्रस्ताव वादात अडकला असून सलीम अली सरोवर संवर्धन समितीने पक्ष्यांचे आर्शयस्थान असणार्‍या या सरोवराची नासाडी होऊ नये यासाठी या प्रकल्पाला विरोध केला आहे. सुशोभीकरणावर आक्षेप घेत समितीचे सदस्य डॉ. किशोर पाठक म्हणाले की, जपानी गार्डनच्या नावाखाली सलीम अली सरोवराची सजावट व सुशोभीकरण सुरू आहे. या सुशोभीकरणाच्या नावाखाली गेल्या सहा महिन्यांत या सरोवराच्या उद्यानात चक्क फुटपाथची नवव्यांदा रंगरंगोटी केली जात आहे. शहरातील इतर उद्यानांच्या देखभालीकडे मनपाचे लक्ष नाही. रस्त्यावरील खड्डे बुजवायला मनपाकडे पैसा नाही. येथे मात्र रंगरंगोटीच्या नावाखाली उधळपट्टी सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. यासंदर्भात मनपाचे कार्यकारी अभियंता सिकंदर अली यांनी डॉ. पाठक यांच्या आरोपांचा इन्कार केला असून सुशोभीकरणाचे काम जवळपास पूर्ण झाले असून त्यावर अंतिम हात फिरवण्याचे काम तेवढे सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

सलीम अली सरोवराच्या सौंदर्यीकरणावर मनपा भरमसाट खर्च करत आहे. येथील उद्यानातील फुटपाथाला नवव्यांदा रंगरंगोटी करण्यात आली आहे. त्यामुळे ही कामे वादाच्या भोवर्‍यात सापडली आहेत.