आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजारपेठेत बंगळुरू येथून दाखल झाला लालबागचा राजा.

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- उन्हाळा सुरू होण्यास एक ते दीड महिना शिल्लक असताना शहरातील बाजारपेठेत लालबागचा राजा हा आंबा विक्रीसाठी दाखल झाला आहे. बंगळुरू, मुंबई येथून दररोज 50 किलो आंब्याची आवक होत असून त्याचा प्रतिकिलो दर 180 ते 200 रुपये आहे.

सध्या दक्षिण भारतात बोरे आणि आंबा याचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे तेथील फळे विक्रीसाठी येत आहेत. मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्याने बाजारात आंब्यांना चांगला भाव मिळत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

मध्य भारतात डिसेंबरअखेर आंब्याच्या झाडाला फुलोरा येऊन 15 फेब्रुवारीपासून हंगाम सुरू होतो. दक्षिण भारतात एक ते दीड महिना अगोदरच सर्व फळे येतात. वास्तविक पाहता आपल्याकडे अक्षय्य तृतीयेपासून आमरस खाण्यास सुरुवात होते, असे फलोत्पादन तज्ज्ञ डॉ. भगवान कापसे यांनी म्हटले. हंगामापूर्वी आंबा आल्याने मनस्वी आनंद झाल्याचे शिवनाथ गोरे यांनी सांगितले. बाजारपेठेत सध्या लालबागचा राजा उपलब्ध असल्याने त्याला चांगला भाव मिळत आहे. 20-25 दिवसांत आंब्याच्या विविध जाती दाखल होतील, आवक वाढून भावही कमी होतील, अशी शक्यता विक्रेते मोहंमद सलीम यांनी वर्तवली.