आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ललित मोदींमुळे देशाची प्रतिमा मलिन - अॅड. निकम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - काहीतरी ट्विट करून ललित मोदी देशाची प्रतिमा मलिन करीत आहेत. त्यांच्या ट्विटवर देशभर निरर्थक चर्चा होत आहे. ते आरोपी आहेत आणि त्यांना आरोपीसारखीच वागणूक मिळायला हवी, असे मत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले. औरंगाबाद येथे रविवारी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

मोदींनी शनिवारी ट्विट करून चेन्नई सुपरकिंगचा रवींद्र जडेजा, ड्वेन ब्राव्हो, सुरेश रैनावर आयपीएलमध्ये सट्टेबाजीचा आरोप केला आहे. १४ दिवसांत त्यांनी जवळपास दीडशे ट्विट केले आहेत. देशाबाहेर राहून ते अनेक व्यक्तींविषयी ट्विट करून देशाची प्रतिमा खराब करीत आहेत. या बाष्कळ चर्चेला एवढे महत्त्व देता कामा नये, असेही निकम म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...