आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूसंपादनामुळे रखडला पाच वर्षांपासून रस्ता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - प्रभाग फ अंतर्गत येणार्‍या मेहरसिंग नाईक महाविद्यालयाकडून भारतनगरकडे जाणाऱ्या ८० फूट डीपी रोडचे काम भूसंपादनामुळे पाच वर्षांपासून रखडले आहे. भारतनगरकडे जाणाऱ्या या एकमेव रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर पाणी साचत असल्याने त्या ठिकाणी मुरमाऐवजी माती टाकण्यात आली. पावसाळ्याचे दिवस असल्याने सर्वत्र चिखल झाल्याने वाहने चिखलात फसत आहेत.भारतनगर, साईनगर, दुर्गेशनगर, आनंदनगर, गणेशनगर, एमराल्ड सिटी, रेणुकानगर आदी भागातील एक लाख नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

भारतनगर परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवंलबून राहावे लागते. रस्त्यावर मुरूमाऐवजी मातीचे ढिगारे टाकण्यात आल्याने टँकरही चिखलात फसत आहे. यानंतर पालिकेने मुरूम टाकण्यासाठी ट्रक मागविला, परंतु रस्त्यावरील मातीच्या चिखलातही ट्रक फसला. वाहनधारकांना चिखलामुळे वाहने चालवणे कठीण झाले आहे. महानगरपालिकेने याकडे दुर्लक्ष केले आहे. भरतनगरकडे जाणाण्यासाठीचा हा एकमात्र रस्ता असताना रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आलेले नाही.

या मुख्य रस्त्यावरच विद्युत पुरवठा करणारे बसवण्यात आलेले विद्युत रोहित्र एका बाजूला झुकलेले आहे. पायी जाणाऱ्या महिला आणि मुले यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे तत्काळ या डीपीची दुरुस्ती करण्यात यावी, रस्त्याचे तत्काळ सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात यावे,अशी मागणी भाऊसाहेब गारुळे, मारुती दुधडकर, राजू पठाण, आलेर पठाण, गणपत पानखेडे यासह परिसरातील नागरिकांनी केली आहे.
मनपाने लक्ष देऊन रस्त्याचे काम पूर्ण करावे
भारतनगरकडे जाणारा हा एकमेव रस्ता आहे. रस्त्यावर माती टाकली आहे.पावसामुळे चिखल झाल्याने वाहने फसत आहेत. भाऊसाहेब गारुळे, रहिवासी
पाण्याचे डबके साचल्याने मुरमाऐवजी माती टाकली आहे. एक लाख नागरिकांसाठी हा एकमेव रस्ता आहे. तत्काळ रस्त्याचे काम झाले पाहिजे.
राजू पठाण, रहिवासी
रस्त्यावर असलेली डीपी कोसळण्याच्या स्थितीत असून ती तत्काळ हटविण्यात यावी.
गणपत पानखेडे, रहिवासी
पाण्याचे टँकर भारतनगरकडे जात नाहीत. या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण झाले पाहिजे. पालिकेने याकडे लक्ष दिले तरच काम पूर्ण होईल. मारुती दुधडकर, रहिवासी
जयदुर्गा हाउसिंग सोसायटीने सिमेंट रस्ता केला आहे. एमराल्ड िसटीपर्यंत डांबरीकरण केले आहे. यापुढचा रस्त्याचे डांबरीकरण न केल्यामुळे चिखल झाला आहे. -आलेर पठाण, रहिवासी
भूसंपादनानंतरच काम पूर्ण
मेहरसिंग नाईक ते भारतनगर डीपी रोडचे भूसंपादनाचे काम सुरू आहे. जागा ताब्यात आल्यावरच रस्त्याचे काम सुरू करण्यात येईल.
बी.डी.फड, उपअभियंता, रस्ते विभाग, मनपा