आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आगामी शैक्षणिक वर्षापासून औरंगाबादेत नॅशनल लॉ स्कूल; तीन जागांची पाहणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- आगामी शैक्षणिक वर्षापासून नॅशनल लॉ स्कूल सुरू होणार आहे. त्यासाठी जागा निवडण्याचे काम सुरू असून मंगळवारी जिल्हा प्रशासन, कुलगुरू सूर्यप्रकाश यांनी वाल्मी तसेच कांचनवाडी येथील शासकीय निवासस्थानांची पाहणी केली. सोमवारी विभागीय आयुक्त तसेच औरंगाबाद खंडपीठाच्या न्यायमूर्तींनी शासकीय अध्यापक महाविद्यालयांची पाहणी केली होती. 

आगामी शैक्षणिक वर्षापासून औरंगाबादेत नॅशनल लॉ स्कूल सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने करोडी येथे ५० एकर जागा दिली आहे. मंगळवारी सकाळी निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे, कुलगुरू सूर्यप्रकाश, उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी वाल्मीच्या जागेची पाहणी केली. 

कांचनवाडीतील शासकीय निवासस्थानांच्या जागेचीही पाहणी करण्यात आली. सोमवारी औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती रवींद्र बोर्डे, संजय गंगापूरवाला आणि मुख्य सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे, कुलगुरू सूर्यप्रकाश, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनीही पाहणी केली होती. 
बातम्या आणखी आहेत...