आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साता-यात लवकरच जमीन मोजणी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - सातारा परिसरातील अनधिकृत बांधकाम नियमित करण्याचा दुसरा टप्पा लवकरच सुरू होत आहे. या आठवड्यात येथील जागेची मोजणी करण्यात येणार आहे.याबाबत प्रशासन दोन दिवसांत निर्णय घेईल.
महसूल, सिडको, भूसंपादन, नगररचना, महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग एकाच छताखाली नागरिकांच्या समस्या सोडवणार आहेत. एक खिडकी योजनेच्या माध्यमातून पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.
डिसेंबर महिन्यात अर्जविक्री आणि प्रकरणे दाखल करण्याचे काम सुरू झाले होते. 15 जानेवारीला अर्ज विक्रीची मुदत संपली. एकूण 12 हजार अर्जांची विक्री झाली तर 9 हजार प्रकरणे दाखल करण्यात आली. या अर्जांच्या छाननीचे काम लवकरच सुरू करण्यात येईल.
या आठवड्यात जमीन मोजणी - ग्रामपंचायत आणि भूमी अभिलेख कार्यालयाच्या माध्यमातून शहरातील एका खासगी कंपनीला जमीन मोजणीचे काम देण्यात आले आहे. खोत पाटील कंपनीकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
ही कंपनी मोजणी करून गट क्रमांकानुसार नकाशे तयार करून त्याच्या तीन प्रती तयार करणार असून, ग्रामपंचायतीला सादर करणार आहे. जिल्हाधिका-यांनी सातारा आणि जवळील 28 गावांमधील अनधिकृत बांधकाम नियमित करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार प्रत्येक विभागाला कामाची विभागणी करण्यात आली आहे. कार्यवाहीचे टप्पे व कालावधी निश्चित करण्यात आलेला आहे.