आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्षाला माती परीक्षण करा; आमदार प्रशांत बंब यांचे आवाहन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गंगापूर- व्यवस्थित व तंत्रशुद्ध शेती करताना जमिनीत कुठल्या मात्रेची उणीव आहे, ही बाब माती परीक्षणाद्वारे समजते. शेतकर्‍यांनी प्रत्येक वर्षी माती परीक्षण केले पाहिजे. प्रत्येकाच्या दारी यासाठी फिरत्या माती व पाणी प्रयोगशाळेची उपलब्धता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने करण्यात आली आहे. ही आमूलाग्र बदलाची नांदी असल्याचे प्रतिपादन आमदार प्रशांत बंब यांनी केले.

गंगापूर येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने तालुक्यातील शेतकर्‍यांसाठी उपलब्ध केलेल्या फिरत्या माती व पाणी प्रयोगशाळेचे लोकार्पण महंत कैलासगिरी महाराजांच्या हस्ते झाले. त्या वेळी बंब बोलत होते. प्रारंभी गिरी आश्रम सावखेड्याचे महंत कैलासगिरी महाराजांच्या हस्ते प्रयोगशाळेचे विधिवत पूजन करून लोकार्पण करण्यात आले.

शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणारी नाही. याचा विचार करून आधुनिक व प्रगत शेतीसाठी शेतकर्‍यांनी कमी पाणी व जास्त उत्पन्न यासाठी ठिबक सिंचनाची कास धरून जीवनमान उंचवावे. गंगापूर तालुक्याची वाटचाल ही आमूलाग्र बदलाकडे होत आहे. माती परीक्षणासाठी प्रत्येक शेतकर्‍यांकडे ही प्रयोगशाळेची गाडी जाईल व शेतकर्‍यांशी सुसंवाद साधणार असल्याचे बंब म्हणाले.