आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरात शिरून लॅपटॉप, मोबाइल पळवला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - उस्मानपुरा येथील अनिकेत अनिल अग्रवाल यांच्या घरात शिरून अल्पवयीन चोरट्याने त्यांचा लॅपटॉप आणि मोबाइल असा 70 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना गुरुवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास घडली. ऐवजासह पोलिस ठाण्यासमोरून पळ काढणारा अल्पवयीन बालक सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे.

उस्मानपुरा भागातील अग्रवाल यांच्या घराचा मुख्य दरवाजा सकाळी उघडाच होता. त्यांची आई घरात काम करत असताना घरात शिरलेल्या अल्पवयीन चोरट्याने टेबलवरील 45 हजार रुपयांचा लॅपटॉप आणि सोफ्यावरील 25 हजार रुपयांचा मोबाइल लंपास केला. हा चोरटा 16 ते 17 वर्षीय असून अग्रवाल यांनी त्याचा पाठलागही केला. मात्र तो सापडला नसल्याने अग्रवाल परत आले. परंतु पोलिस ठाण्यासमोरून पळणारा हा चोरटा सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे. याप्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.