आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निर्दयी पित्याने पोराचे तुकडे पिशवीमध्ये दिले अाईकडे, चिमुकल्याला बापाने टाकले रेल्वे ट्रॅकवर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लासूर स्टेशन (औरंगाबाद) - स्वत:च्या पाेटच्या चार वर्षांच्या मुलाला रेल्वेखाली टाकून दिले. रेल्वेने कटून मुलाचे झालेले दाेन तुकडे पत्नीला पिशवीत अाणून देणाऱ्या निर्दयी बापाला न्यायालयाने चार दिवसांची पाेलिस काेठडी सुनावली अाहे.
घटना गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन जवळील भानवाडीची असून, साेमवारी रात्री मधुकर वानखेडे व त्याची पत्नी पुष्पा (मुलाचे अाई-वडील)यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. सात वर्षांपूर्वी या दाेघांचा प्रेमविवाह झाला हाेता. काही दिवस अानंदात गेल्यानंतर दाेघांमध्ये वादाला सुरुवात झाली. मधुकर नेहमीच पुष्पाच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्याशी भांडत असे. या दाेघांना दाेन अपत्ये हाेती. चार वर्षांचा अाेम अाणि सहा वर्षांची रूपाली. साेमवारी रात्री १० वाजता मधुकर अाणि पुष्पाचे पुन्हा कडाक्याचे भांडण झाले. यानंतर मधुकर अाेमला घेऊन घराबाहेर पडला. मधुकरला दारूचे व्यसन असल्याने त्या नशेत त्याने अाेमला भानवाडी येथील रेल्वे पटरीवर टाकून दिले. यानंतर अाेमच्या अंगावरून रेल्वे गेल्याने त्याचे दाेन तुकडे झाले.

...घे तुझा मुलगा
रात्री अाेमला घेऊन बाहेर पडलेला मधुकर एकटाच रात्री परतल्यानंतर पुष्पाने त्याला अाेमसंदर्भात विचारणा केली. ‘मी त्याला पटरी खाली फेकून दिले’ असे उत्तर मधुकरने पुष्पाला दिले. पुष्पाचा यावर विश्वास बसला नाही. अाेमला घरी घेऊन या अशी विनवणी तिने मधुकरला केली. यानंतर हातात पिशवी घेऊन मधुकर घराबाहेर पडला व रेल्वे पटरीवर झालेले अाेमचे तुकडे त्याने त्या पिशवीमध्ये जमवत ते पुष्पापुढे करत, हा घे तुझा अाेम असे सांगितले. पिशवीमध्ये अाेमचे तुकडे पाहिल्यानंतर पुष्पाने टाहाे फाेडत शेजाऱ्यांना गाेळा केले.

मधुकर म्हणताे, मुलगा हातातून सुटला
रेल्वे पटरीवरून जाताना अाेम हातातून सुटला व ताे रेल्वेखाली अाला, अापण त्याला रेल्वे पटरीवर टाकले नाही, असा दावा अाता मधुकर करत अाहे.

१४ तारखेपर्यंत काेठडी
पुष्पाने घटनेची माहिती दिल्यानंतर शिल्लेगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, उपनिरीक्षक संदीप काळे, प्रशांत मुंडे, युनूस शेख, हरी नरके, कैलास राठोड, यांनी घटनास्थळी व घरी भेट देत मधुकरला ताब्यात घेतले. पुष्पाच्या तक्रारीवरून मधुकरवर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात अाली. मंगळवारी न्यायालयाने त्याला १४ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली अाहे.
बातम्या आणखी आहेत...