आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोकळा कांदा विक्री पद्धतीमुळे शेतकऱ्यांच्या पदरी १०० रुपये जास्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लासूरस्टेशन - बाजार समितीत गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सुरू झालेल्या मोकळा कांदा लिलाव पद्धतीमुळे शेतकऱ्यांना एक क्विंटल कांद्यासाठी लागणारा साठ रुपयांचा बारदाना, एक किलो कटती, दोन टक्के अाडत असा एकूण सरासरी १०० रुपयांचा नफा झाला. आगामी काळात शेतकऱ्यांचा बाजाराकडे कल वाढणार असल्याची शक्यता बाजार समितीने वर्तवली आहे.
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा मार्केट यार्डात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर वाहनातील मोकळ्या कांद्याचा उघड लिलाव खरेदीचा शुभारंभ सभापती कृष्णा पाटील डोणगावकर यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आला. खुल्या कांदा बाजारातून बाजार समितीला दिवसभरात एक रुपया पाच पैसे या दराने सुमारे सहा हजार ५८७ रुपये बाजार शुल्क मिळाले, तर भुसार मालाचे ६६ हजार ६५४ रुपयांचे उत्पन्न झाले. एकूण ७३,२४१ रुपये बाजार शुल्काच्या रूपात बाजार समितीला मिळाल्याची माहिती समितीच्या वतीने देण्यात आली. या उपक्रमास शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून सुरुवातीलाच सुमारे ८० वाहनांतून शेतकऱ्यांनी तब्बल तेराशे क्विंटल मोकळा कांदा विक्रीसाठी आणला होता, अशी माहिती बाजार समितीचे सचिव किशोर पोकर्णे यांनी दिली.
या वेळी उपसभापती दिनेश मुथा,संचालक रमेश पाटील डोणगावकर, जनार्दन पवार, महेंद्र पांडे, दादा पाटील जगताप, रवींद्र पोळ, कारभारी वंजारे, संतोष काळवणे, कडुबा हिवाळे, शेषरावनाना जाधव, अंबादास गायके, वाल्मीक चव्हाण, भाऊसाहेब नेमाने, रतिलाल मुनोत, कैसर बागवान, सचिव किशोर पोकर्णे आदीसह बाजार समितीचे संचालक, शेतकरी, व्यापारी उपस्थित होते.
मराठवाड्यातील दुसऱ्या क्रमांकाची बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासूर स्टेशन येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा मार्केटमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने बाजार समितीने आठवड्यातील प्रत्येक सोमवारी शुक्रवारी वाहनांमध्ये मोकळा कांदा खरेदी व्यवहार सुरू करण्याचा निर्णय प्रथमच घेऊन गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या उपक्रमास प्रारंभ झाला. याला शेतकऱ्यांचादेखील मोठा प्रतिसाद मिळाला. शुक्रवारी विक्री झालेल्या कांद्याला प्रतिक्विंटल दोनशे रुपयांपासून आठशे अडतीस रुपयांपर्यंत भाव मिळाला.
प्रथमच सुरू करण्यात आलेल्या या पद्धतीच्या लिलावाची यशस्वी अंमलबजावणी सचिव किशोर पोकर्णे, उपसचिव कचरू रणयेवले, रावसाहेब तांबे, प्रल्हाद मिसाळ, अमोल नरोडे, संजय काळे, संतोष पवार, गणेश खेडकर यांनी केली. विशेष म्हणजे रविवार आणि बुधवारीच कांदा मार्केटचा बाजार असतो शिवाय भुसार माल मंगळवार आणि रविवारी बंदचा वार वगळता आठवडाभर सहाही दिवस भुसार मालासाठी मार्केट उघडे असते.
परंतु वाहनांतील मोकळा कांदा खरेदी करण्याचा निर्णय नुकताच बाजार समिती प्रशासनाने घेतला त्यामुळे सोमवार आणि शुक्रवार असे दोन वार वाढल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा चांगला निर्णय ठरला आहे.
बाजार समितीमधील कांदा मार्केटमध्ये मोकळा कांदा खरेदीचा शुभारंभ सभापती कृष्णा पाटील डोणगावकर यांच्या हस्ते झाला.
नाव अावक किमान कमाल
ज्वारी १३१५ (क्वि.)१५५०२५०० (रु.)
गहू१०२ (क्वि.)१४७५२००० (रु.)
बाजरी१२२ (क्वि.)१३१११९४६ (रु.)
हरभरा१६० (क्वि.)३४००५२२५ (रु.)
तूर२७० (क्वि.)७९००८४३१ (रु.)
साेयाबीन१४ (क्वि.)३९५०३९७० (रु)
मका२० (क्वि.)१३००१४१२ (रु.)
भुसार मालाची अावक वाढली
बाजारसमिती मधील २२ आडत धान्य दुकानावर गंगापूर, खुलताबाद, देवगाव रंगारी, कन्नडसह वैजापूर तालुक्यांतील विविध शेतकऱ्यांनी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर शुक्रवारी शेतीमाल विक्रीसाठी आणला होता. यात ज्वारी, बाजरी, सोयाबीन, मका,तूर, हरभरा आदी शेतमालाची आवक झाली.
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर लासूर स्टेशन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात ८० वाहनांतून मोकळा कांदा विक्रीसाठी आला होता. छाया: मकसूद शेख