आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लासूरचा टोलनाका सुरू,सावंगी नाक्याचीही तयारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - नागपूर-मुंबई महामार्गावरील भानवाडीजवळील टोलनाका रविवारपासून पोलिस बंदोबस्तात सुरू झाला. याशिवाय ऑक्टोबर महिन्यात बंद करण्यात आलेला जळगाव रोडवरील सावंगीचा टोलनाकाही पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. रस्त्यांची दुरवस्था कायम असतानाच नाके सुरू होत असल्याबाबत संशय व्यक्त होत आहे. लासूर स्टेशनजवळील नाका असाच अचानक सुरू झाला होता. परंतु आमदार प्रशांत बंब यांनी आंदोलन केले. त्यामुळे या नाक्यासह चार नाके बंद करण्यात आले होते. आताही बंब यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना निवेदन देऊन टोलवसुली थांबवण्याची मागणी केली आहे. मुंबईच्या पथकर नियंत्रण कक्षाने या नाक्याला परवानगी दिली असून, हा नाका रस्ता नव्हे, तर शहराच्या विकासासाठी आहे, असे राज्य रस्ते विकास महामंडळाचे अभियंता उदय भराडे यांनी सांगितले.