आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विलंब कोर्ट-कचे-या मुळे; झाले ते काम आम्हीच केले!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - बायपास वेळेत पूर्ण न होण्यामागे कोर्ट-कचे-या चे कारण असल्याचे आमदारांचे म्हणणे आहे. आतापर्यंतच्या कामाचे श्रेय आमदार संजय शिरसाट, कल्याण काळे यांनी घेण्याचा प्रयत्न केला आहे.
भूसंपादनाविरुद्ध लोक न्यायालयात धाव घेत असल्याने केंब्रिज-सावंगी, सावंगी-मिटमिटा, मिटमिटा-तिसगाव आणि पैठण-नगर रस्ता बायपासला विलंब झाल्याचा दावा या मंडळींनी केला. आजवरची कामे आपल्यामुळे मार्गी लागल्याचे शिरसाट व काळे यांचे म्हणणे आहे. प्रदीप जैस्वाल, किशनचंद तनवाणी यांनी आपला या रस्त्यांशी काय संबंध, असे सांगून हात झटकले आहेत.
श्रेय लाटण्यासाठी लोकप्रतिनिधींची धडपड
संजय शिरसा
आमदार, औरंगाबाद पश्चिम
पैठण व नगर रस्त्याला जोडणा-या बायपाससाठी प्रयत्न केले. अनेक वर्षे रेंगाळलेले काम सुरू झाले ते माझ्या प्रयत्नानेच. लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले आहे, असे म्हणता येणार नाही. कोर्ट-कचे-या मुळे विलंब होतो.
डॉ. कल्याण काळे
आमदार, फुलंब्री

केंब्रिज ते सावंगी या रस्त्यासाठी मी पाठपुरावा केला. काम न करणा-या ठेकेदाराला बदलण्यास भाग पाडले. या रस्त्याचे काम लवकरात लवकर होईल. हे घडणार आहे, ते माझ्या पाठपुराव्यामुळेच. येथेही कोर्ट-कचे-या झाल्याच. त्याला पर्याय नाही.
प्रदीप जैस्वाल
आमदार, औरंगाबाद मध्य
बायपासची समस्या माझ्या मतदारसंघात नाही. शहरातील पूल होण्यासाठी मी प्रयत्न केले. बायपाससाठी आमचे सहकारी शिरसाट यांनी प्रयत्न केले.
किशनचंद तनवाणी
आमदार, स्थानिक स्वराज्य संस्था
शहरातील वाहतुकीची कोंडी कमी करणारे बायपास व्हावेत यासाठी मी पाठपुरावा केला नाही, हे खरे आहे. आमचे सहकारी त्यासाठी प्रयत्न करत होते. त्यांना मदत करण्याचा प्रयत्न मात्र केला.