आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शर्यतीत बैलांना पाजली जाते दारू, कुणी घेतो शेपटीला चावा, असेही करतात हाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - केंद्र शासनाने अखेर आज ग्रामीण भागामध्ये लोकप्रिय असलेल्‍या बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवली असून त्यामुळे आता गावागावात पुन्हा एकदा सर्जा-राजाच्या शर्यतींचा धुराळा उडणार आहे. बैलगाडीच्या शर्यतींची महाराष्ट्राला सुमारे चारशे वर्षांहून अधिक परंपरा आहे. या शर्यती आजही शेतकऱ्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. ग्रामीण भागात मनोरंजनाचे साधन म्‍हणून याकडे पाहिले जाते.
मात्र, शर्यतीच्‍या नावाखाली बैलांचे हाल होत असल्‍याचे लक्षात आल्‍यानंतर प्राणीप्रेमींनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. कोर्टाने प्राण्‍यांचे हाल करणा-या खेळावर बंदी घालण्‍याचा आदेशही दिला होता. मात्र सध्‍या बंदी उठवल्‍याच्‍या निर्णयाचे शेतक-यांकडून स्‍वागत होत आहे.

प्राणीप्रेमींच्‍या मते असे होतात बैलांचे हाल...

- शर्यतीमध्ये बैल जास्‍त धावावे यासाठी त्‍यांना दारू पाजली जाते.
- काठीने बैलांना जोरदार मारले जाते.
- शेपूट पिरंगळणे किंवा चावणे.
- काठीला खिळे टोचून बैलाला मारणे.
- बैलाला उपाशी ठेवणे.
- बैल धावावा यासाठी त्‍याच्‍यामागे कर्णकर्कश आवाजात मोटारसायकली पळवणे.
पुढील स्‍लाइड्सवर फोटोंमधून पाहा, शंकरपटाचा थरार आणि बैलांचे हाल...