आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताजा महाराष्‍ट्र : दरोडेखोर म्‍हणाले, \'भाऊ, माफ करा ! पोटासाठी तुम्‍हाला लुटतोय\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कपाटाची पाहणी करताना पोलिस. - Divya Marathi
कपाटाची पाहणी करताना पोलिस.
पैठण - तालुक्‍यातील ढाकेफळ गावातील एका घरावर आज (शुक्रवार) पहाटे चार ते पाच जणांच्‍या टोळक्‍याने दरोडा टाकला. दरम्‍यान, घर मालकाच्‍या डोळ्यात मिरची पावडर टाकून 25 हजारांची रोकड आणि सोने, चांदीचे दागिने त्‍यांनी लुटून नेले. हातात शस्‍त्र घेऊन घर मालकाला धमकी देण्‍याऐवजी ते म्‍हणाले, ''भाऊ, माफ करा ! पोटासाठी तुम्‍हाला लुटतोय,'' असे म्‍हणत त्‍यांनी घर साफ केले. परंतु, या प्रकारामुळे घरातील सर्वच सदस्‍य प्रचंड घाबरले होते. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला असून, अधिक तपास सुरू आहे.
डोळ्यात मिरची पावडर टाकली, नंतर डोळे धुयायला पाणी दिले
पैठण एमआयडीसी परिसरातील ढाकेफळ येथे संजय सुखदेव शिसोदे यांचे घर आहे. शुक्रवारी पहाटे त्‍यांचे कुटुंबीय गाढ झोपेत होते. पहाटे 4 वाजताच्‍या सुमारास चार ते पाच दरोडेखोरांनी घराच्‍या मागील दरवाजाचा कडीकोंडा तोडून प्रवेश केला. दरम्‍यान, घरात कुणी तरी घुसल्‍याचे कळताच शिसोदे खडबडून जागे झाले. पण, त्‍यांनी प्रतिकार करण्‍यापूर्वीच दरोडेखोरांनी त्‍यांच्‍या डोळ्यात मिरची पूड टाकली. नंतर त्‍यांनीच डोळे धुयाला पाणीही दिले. नंतर तलावर आणि तीक्ष्‍ण शस्‍त्राचा धाक दाखवून कपाटातील रोख 25 हजार रुपये आणि 70 हजार रुपयांचे दागिने लंपास केले. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक बच्‍चनसिंग हे आपल्‍या पथकासह घटनास्‍थळी आले. मात्र, तो पर्यंत दरोडेखोर फरार झाले होते.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा,
- 'नटवरलाल'ने सराफा व्‍यावसायिकाला घातला 32 लाखांचा गंडा, 'स्‍पेशल 26' स्‍टाइल फसवले
- तडीपार गुंडाने घातला पुण्‍यात धुडगूस, वाहनांचे नुकसान