आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेतील पहाडसिंगपुरा भूखंड घोटाळा, साक्षीदाराची आत्महत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - बेगमपुऱ्यातील पहाडसिंगपुरा भागात अनधिकृत जमिनीवर प्लॉटिंग करून 200 नागरिकांना विक्री करत फसवणूक केल्या प्रकरणी नगरसेवक राजू तनवाणी व इतर तिघांवर गुन्हा दाखल करण्यात झाला आहे. दरम्‍यान, या प्रकरणातील प्रमुख साक्षीदार शिवाजी कोरडे याने औरंगाबादच्‍या लेणी परिसरातील एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्‍याची घटना आज (शुक्रवार) सकाळी उघडकीस आली. त्‍यामुळे खळबळ उडाली आहे.
87 जणांनी पक्‍की घरे पाडली
औरंगाबाद शहरातील बेगमपुरा परिसरातील बिबी का मकब-याच्या पाठीमागे असलेल्या वादग्रस्त भूखंडावर 200 प्लॉट पाडून नगरसेवक राजू तनवाणी यांच्यासह राज आहुजा, दिवंगत संताराम कोरडे व तत्कालीन तलाठी यांनी नागरिकांकडून पैसे घेऊन प्लॉटची विक्री केली. त्यामुळे नागरिकांनी या भागात रेणुकानगर आणि ताजनगर नावाच्या वसाहती उभ्या करून पक्के बांधकाम केले. मात्र, न्यायालयात या जमिनीवरून सुरू असलेला वाद निकाली लागुन ही जमीन मुळमालक माधवराव सोनवणे यांना परत करण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे प्रशासनाने कारवाई करून या भागातील 87 कुटुंबियांची घरे तोडून टाकली. तर अनेकांची घरे सील लावून जप्त करण्यात आलीत.