आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जायकवाडीत नाशिकचे पाणी; भंडारदरा तुडूंब भरले, हजार क्युसेक विसर्ग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण - नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरणातून जायकवाडीसाठी या हंगामात पहिल्यांदाच सोमवारी सुमारे एक हजार ११६ क्युसेक पाणी सोडण्यात आले. सध्या जायकवाडीचा साठा २५.१४ टक्के असून तो ३० टक्क्यांच्या घरात जाण्याचा अंदाज आहे. भंडारदरा पूर्ण क्षमतेने भरले असून हजार २२८ क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. या पाण्यामुळे सोमवारी रात्रीपर्यंत निळवंडे धरणात पूर्ण क्षमतेने ६५०० दशलक्ष घनफूट साठा ठेवून उर्वरीत पाणी प्रवरा नदी पात्रात सोडले जाणार आहे. सोमवारी नािशक िजल्ह्यातील गंगापूर धरणाचा साठा ८० टक्क्यांच्या पुढे गेला. परिणामी गोदापात्रात पाणी सोडण्यात आले. सध्या एक हजार ११६ क्युसेक पाणी सोडण्यात आलेले अाहे. दुसरीकडे नांदूर - मधमेश्वरमधून १५ हजार २२८, नागमठाण - हजार ८८२, दारणातून - हजार ८५० क्युसेक पाणी जायकवाडीत येत आहे.
नािशक िवभागात जोरदार पाऊस झाल्यास िवसर्ग वाढण्याची शक्यता आहे.
भंडारदरा धरण सोमवारी पूर्ण क्षमतेने भरल्याने पाणी सोडण्यात आले. छाया : विलास तुपे.

राज्यात पावसाचा जोर कायम
पुणे राज्यातविदर्भ तसेच छत्तीसगड तेलंगणच्या परिसरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून त्याची तीव्रता वाढली आहे. उत्तर महाराष्ट्र ते केरळच्या किनाऱ्यालगतही कमी दाबाचा पट्टा पुरेशा तीव्रतेने कायम आहे. याचा परिणाम राज्याच्या विविध भागांत पावसाचा जोर पुढील २४ तास कायम राहू शकतो. सोमवारी दिवसभर कोकण-गोवा-मध्य महाराष्ट्र, विदर्भासह मराठवाड्यात पावसाचा जोर कायम असून येत्या दोन जोरदार पाऊस होण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे.
त्र्यंबकेश्वरला एकाच रात्रीत ११० मिमी पाऊस
त्र्यंबकेश्वर - येथेरविवारी एकाच रात्रीत सुमारे ११० मिमी पावसाची नोंद झाली. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. आगामी कुंभमेळ्यासाठी सुरू असलेल्या कामांमुळे शहरात जिकडेतिकडे बांधकाम साहित्य पडलेले असून जलवाहिन्या, गटारीच्या बांधकामांसाठी रस्ते खाेदण्यात अालेले अाहेत. गाैतमी-गाेदावरी प्रकल्पातून नूतन वाहिन्या शहरात अाणण्यात येत असल्याने अनेकांच्या खासगी वाहिन्या ताेडल्या जात अाहेत. त्यामुळे भरपावसाळ्यात पाणीटंचाई जाणवत अाहे.
धरणातील टक्केवारी
मुळा-८०टक्के, दारणा-९७.१०, भंडारदरा- १०० टक्के, गंगापूर-९३ टक्के, करंजवन-७६, नांदूर-मधमेश्वर-८७.५४, ओझरखेड-४३.६३, पालखेड-१००, निळवंडे- ९३.२६ टक्के. गेल्या वर्षी जायकवाडी धरणाचा साठा ३३ टक्के झाला होता. यंदा मात्र तो वाढण्याची शक्यता आहे.
मुंबईतही धुवाधार पाऊस
मुंबई सोमवारीमुंबई उपनगरात पुन्हा जोरदार हजेरी लावली. येत्या ४८ तासांत मुंबईत मुसळधार पाऊस होणार असल्याचे वेधशाळेच्या व्ही. के. राजीव यांनी सांिगतले. सध्या मुंबईत पावसाला अनुकूल िस्थती आहे. दोन िदवसांत मुंबईत जोरदार पाऊस होईल, तर मध्य महाराष्ट्र कोकणात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

सोमवारी झालेल्या पावसामुळे दादर, परळ, सायन, कुर्ला, घाटकोपर या भागांत पाणी साचले होते, तर मुंबई - पुणे महामार्गावर काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती. सोमवारच्या पावसामुळे उत्तर मुंबईतील िवहार धरण तुडुंब भरून वाहत आहे. येथील सातही धरणे बऱ्याचअंशी भरल्याची मािहती सूत्रांनी िदली.