आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाडेकरूंची माहिती दिली नाही; सिल्लोडमध्ये एटीएसची तिघांविरुद्ध कारवाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिल्लोड - पंधरादिवसांपूर्वी बजावलेल्या नोटिसीनुसार भाडेकरूंची माहिती दिली नसल्याने बुधवारी दहशतवादविरोधी पथकाने जयभवानीनगरातील तीन घरमालकांवर गुन्हा दाखल केला.
पुंडलिक पुंजाजी काकडे, आत्माराम विठ्ठल जंजाळ संजय भिकन राऊत अशी या तिघांची नावे आहेत. सिल्लोड पोिलसांनी काही भागातील घरमालकांना भाडेकरूंची मािहती देण्याविषयी नोटीस बजावली होती. मोबाइलचे सिमकार्ड, भाडेकरूंची मािहती घेण्यासाठी आलेल्या एटीएसच्या पथकाला तिघांनी भाडेकरूंची माहिती दिली नसल्याचे निदर्शनास आले. त्यावरून ही कारवाई करण्यात आली. भाडेकरूची पुरेशी ओळख पटल्याशिवाय ओळखीचा पुरावा असल्याशिवाय मालकांनी घरे भाड्याने देऊ नयेत, असे अावाहन पोिलस निरीक्षक सुनील बिर्ला यांनी केले आहे. पुण्याच्या फरासखाना येथील स्फोटप्रकरणी वाळूजमधील दोन जणांना पोलिसांनी अलीकडेच अटक केली. त्यामुळे या कारवाईला महत्त्व आले आहे.