आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधानसभा निवडणूक : राज्यकर्त्यांचे ‘ब्रँडिंग’, विदेशी कंपनी रांगेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - लोकसभा निवडणूकीत भाजपने पानीपत केल्यानंतर राज्यातील काँग्रेस आघाडी सरकार खडबडून जागे झाले आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत दहा वर्षांतील उल्लेखनीय कामगिरी जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी खाजगी ‘पीआर’ कंपनी नेमण्याचा निर्णय राज्यकर्त्यांनी घेतला असून, त्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात 93 कोटींची स्वंतत्र तरतूदही केली आहे. आता हे काम मिळवण्यासाठी अमेरिकेतील कंपनीही रांगेत आहे.

लोकसभा निवडणुकीतील हायटेक प्रचारावर भाजपने 450 कोटी रुपये खर्च केल्याचे बोलले जाते. राज्यातील सरकारने भाजपच्या या मोहिमेचा धसका घेत उपायायोजना चालवली आहे. राज्यात |ऑक्टोबरमध्ये होऊ घातलेल्यांना विधानसभा निवडणुकीपर्यंत मोदी लाट राहिल्यास आपले काही खरे नाही, असा काँगे्रसचा कयास आहे. यामुळे दोन कार्यकाळात केलेली कामे लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी सरकार ब्रँडींगवर भर देणार आहे.

93 कोटींची तरतूद
हक्काचे माहिती व जनसंपर्क खाते असतांनाही शासनाने या कामी खाजगी पीआर कंपनी नेमण्याचा निर्णय घेतला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याचा पुरवणी अर्थसंकल्पात प्रसिद्धी व जनसंपर्कासाठी 93 कोटींची तरतूद केली आहे. आचारसंहिता लागण्यापूर्वी ही रक्कम खर्च करून जनतेपर्यंत कामे पोहचण्यासाठी शासनाचा प्रयत्न आहे.

8 कंपन्यांचे प्रेझेंटेशन
पीआरच्या कामात खुद्द मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण लक्ष घालत असून, मिडीया कँपेनचा अजेंडा ठरवत आहेत. मुंबईची परफे क्ट रिलेशन्स, अमेरिकेची हिल + नॉलटन स्ट्रेटेजिज, एमएसएल ग्रुप, ग्लोबल पब्लिक रिलेशन्स अशा देशविदेशातील 8 कंपन्यांनी त्यासाठी प्रेझेंटेशन दिले आहे.

1. वृत्तपत्रे, टीव्ही, होर्डिंग्ज बसेसवर जाहिराती : वृत्तपत्र, टेलिव्हीजन, एसटी व बेस्ट बस, रेल्वे आणि होर्डिंगवर जाहिराती करण्याचे काम निवडल्या जाणार्‍या कंपनीला देण्यात येणार आहे.
2.डिजिटल मीडियाचाही वापर करणार : लोकसभेच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यंनी डिजीटल मिडीयाचा खुबीने वापर केला. राज्यातही तसे करायचे आहे. त्यासाठी डिजीटल कोशंट कंपनीने प्रेझेंटेशन सादर केले आहे.