आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तावडेसाहेब, आमचा दोष काय? संतप्त झालेल्या शिक्षकांचा सवाल...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लाठीमारात डोके फुटलेला एक मोर्चेकरी. - Divya Marathi
लाठीमारात डोके फुटलेला एक मोर्चेकरी.
औरंगाबाद - गेल्या१५ वर्षांपासून आम्ही हक्कासाठी लढत आहोत. त्यांना न्याय देण्याऐवजी तुम्ही पोलिसांना लाठ्या चालवण्याचे आदेश देता. हा कुठला न्याय आहे? शिक्षणमंत्री विनोद तावडेजी, सांगा आमचा दोष काय, असा सवाल विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांनी केला आहे.
पोलिसांच्या लाठीमारात जखमींना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीने काही शिक्षकांशी संवाद साधला असता त्यांनी संतप्त स्वरात भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, राज्यात आघाडीचे सरकार असतानाही आम्ही आंदोलन करत होतो. त्याला आताचे शिक्षणमंत्री पाठिंबा देत होते. सत्तेवर आल्यानंतर लगेच प्रश्न सोडवू, असे सांगत होते. प्रत्यक्षात त्यांनी काहीच केले नाही. आजतर आमच्यावर लाठ्यांचा वर्षाव केला. उषा कदम म्हणाल्या की, पोलिसांनी महिला, पुरुष काहीही पाहता बेछूट लाठीमार सुरू केला. आम्हाला न्याय अपेक्षित होता. त्यांनी लाठ्या दिल्या. विजय कवर म्हणाले की, इतर क्षेत्रांसाठी हजारो कोटींचे पॅकेज जाहीर होतात. आम्ही मागील १५ वर्षांपासून मागणी करत आहोत; पण त्याची साधी दखलही सरकार घेत नाही.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या सविस्तर बातमी...
बातम्या आणखी आहेत...