आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लावणी, जोगव्याच्या तालावर ठेका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - प्रकृती स्वास्थ्यासोबत दररोज व्यायाम करणार्‍या महिला आज चक्क गाणी म्हणण्यात, लावणी नृत्यावर ठेका धरण्यात दंग झाल्या होत्या. वय विसरून त्यांनी धमाल उडवून दिली. हे दृश्य होते गारखेडा परिसरातील बोधेकर जिममधील.

रामायणा कल्चरल हॉलच्या मागील बाजूस संध्या बोधेकर यांचे जिम आहे. तेथे या भागातील अनेक महिला व्यायामासाठी येतात. त्यांच्यात चांगलीच मैत्री झाली. पाहता पाहता त्या कुटुंब सदस्य झाल्या. जिमच्या संचालक संध्या बोधेकरही त्यात सहभागी झाल्या. शरीर सुदृढ ठेवण्यासाठी व्यायाम करणे जसे आवश्यक आहे. तसेच मानसिक स्वास्थ्याकरिता मनोरंजन, गप्पागोष्टी आणि सांस्कृतिक उपक्रमही गरजेचे आहेत, असा विचार बोधेकर यांनी मांडला आणि त्यास सर्व सदस्यांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला. एवढेच नव्हे तर त्यात कला प्रकार सादर करण्याचेही मान्य केले. त्यानुसार संक्रांतीचे निमित्त साधून गुरुवारी (16 जानेवारी) या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

पूजा यांनी ‘जाऊ द्या ना घरी’ या नटरंगमधील गाजलेल्या लावणीवर ठसकेबाज नृत्य केले. त्यावर सर्व सदस्यांनीही ठेका धरला होता. जिग्ना पटेल यांचा लुंगी डान्सही सर्वांना भावला. जानकी ग्रुपने सदस्यांना पारंपरिकतेकडे वळवणारा जोगवा सादर केला. याच ग्रुपच्या नीता भाकरे यांनी प्रहसन सादर केले. बोधेकर जिमतर्फे सदस्यांना तुळशीचे रोप आणि तिळगूळ देण्यात आला. दोन तास चाललेल्या या धमाल मैफलीच्या यशस्वितेसाठी संगीता देशमुख, अनिता देशपांडे, शिल्पा पाठक, प्रिया बोरकर, पूजा शर्मा, वर्षा जाधव, वृषाली पाटील, दीपाली चामले, रूपाली चव्हाण, निरू व्यास यांनी सहकार्य केले.

आम्ही विविध निमित्ताने सहली, गप्पा-गोष्टींसारखे उपक्रम हाती घेत असतोच. यंदा संक्रांतीमुळे कौटुंबिक स्वरूपातील सांस्कृतिक मैफल आयोजित करण्याचे ठरवले. जिममधील माझे सहकारी आणि सदस्य महिलांमुळे ही मैफल रंगतदार झाली. यामुळे सदस्यांमधील सुप्त कलागुणांनाही व्यासपीठ मिळाले. संध्या बोधेकर, संचालक, बोधेकर जिम