आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधी शाखा सीईटी १८,१९ जूनला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - विधी शाखेच्या (लॉ)अभ्यासक्रमासाठी राज्यात यंदापासून प्रवेशपूर्व परीक्षा घेतली जाणार आहे. १५० गुणांची ही परीक्षा १८ १९ जून रोजी घेतली जाणार आहे. १० मेपासून अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या सामाईक प्रवेश परीक्षा विभागाने नुकत्याच सर्व प्रवेश परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानुसार विधी अभ्यासक्रमासाठी राज्यात प्रथमच १५० गुणांची सीईटी घेतली जात आहे. २०१६-१७ या शैक्षणिक वर्षापासून विधी अभ्यासक्रमाचे प्रवेश सीईटीच्या माध्यमातून निश्चित केले जाणार आहेत.
पाच तीन वर्षीय विधी अभ्यासक्रमासाठी १८ १९ जूनला सीईटी होणार असून यासाठी १० ते २३ मे दरम्यान ऑनलाइन अर्ज भरता येतील. यंदा प्रथमच राज्यातील विधी महाविद्यालयात केंद्रीय पद्धतीने प्रवेश दिला जाणार असून, या परीक्षेचा निकाल ३० जून रोजी जाहीर होणार आहे. विधी अभ्यासक्रमासह बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अॅण्ड केटरिंग, एम.आर्चसाठी २९ मे रोजी परीक्षा होणार आहे. एम.एड.साठी ११ जून तर बीएडसाठी १२ जून रोजी परीक्षा होत आहे. बीपीएडसाठी २४ जुलैला लेखी तर २५ २६ जुलैला फिल्ड टेस्ट होणार आहे. एमएचटी सीईटी मे रोजी होणार आहे. २० जून रोजी फिजिओथेरपी, ऑडियोलॉजी, स्पीच पॅथॉलॉजी तर इतर अभ्यासक्रमांसाठी ऑगस्ट रोजी सीईटी होणार आहे.