आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवाळीतील पाच दिवसांत फक्त लक्ष्मीपूजनालाच झाले वायुप्रदूषण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद  - यंदाच्या दिवाळीत औरंगाबादकरांनी प्रदूषणमुक्त हवेत श्वास घेतला अाहे. रहिवासी भागात फटाके विक्रीस बंदीचा न्यायालयाचा आदेश, दिल्लीत फटाके विक्रीवर बंदी आणि फटाक्यांच्या दुष्परिणामांच्या जनजागृतीमुळे हा बदल घडून आला. यंदा दिवाळीच्या ५ पैकी लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच फटाक्यांमुळे प्रदूषण झाल्याची नोंद झाली. इतर दिवशी सर्व प्रदूषक घटक मर्यादेत होते. एकच दिवस हवेची गुणवत्ता वाईट श्रेणीत होती. ही वाळूजमधील चाचण्यांची आकडेवारी असली तरी शहरातही अशीच स्थिती असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

१९ तारखेच्या फटाक्यांनी २० तारखेला प्रदूषण : औरंगाबादेत दिवाळीच्या काळातील हवेच्या चाचण्यात केवळ २० ऑक्टोबर हा दिवस सर्वात प्रदूषित ठरला. हे प्रदूषण १९ ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजनाला फोडलेल्या फटाक्यांचे होते. यातील बरीच आकडेवारी रात्री १२ नंतरची असल्याने ते पाडव्याच्या प्रदूषणात मोजले गेले. गेल्यावर्षी सर्वच दिवस प्रदूषण मध्यम आणि वाईट स्वरूपाचे होते.

असा झाला परिणाम 
लक्ष्मीपूजनाला सर्वाधिक फटाके फोडले जातात. यामुळे रात्री ११ च्या सुमारास पीएम १० चे प्रमाण २८६ वर (वाईट) गेले होते. रात्री १२ वाजता ते ४०५ (गंभीर) झाले. पीएम २.५ चे प्रमाण रात्री ११ वाजता ३८३ (अत्यंत वाईट), तर १२ वाजता ४५१ (गंभीर) वर होते. लक्ष्मीपूजनाच्या फटाक्यांचे परिणाम शुक्रवारी जाणवले. गुरुवारी रात्रीपासून वाढलेल्या  पीएम १० चे प्रमाण शुक्रवारी पहाटे ३ पर्यंत होते. पीएम १० हे ४२९ (गंभीर) वर पोहोचले होते. शुक्रवारी पहाटे ६ पर्यंत हे प्रमाण क्षमतेपेक्षा अधिक २२८ होते. गुरुवारी रात्री वाढलेले पीएम २.५ चे प्रमाण मध्यरात्री १ च्या सुमारास ४५६ (गंभीर) झाले. शुक्रवारी दुपारी १२ वाजेनंतर ते सामान्य झाले.  

औरंगाबादेत येथे होतात चाचण्या : महाराष्ट्र  प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने (एमपीसीबी) दरवर्षी दिवाळीच्या काळात हवा आणि ध्वनी प्रदूषणाच्या चाचण्या घेतल्या जातात. औरंगाबादेत कडा कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, औरंगपुरा आणि वाळूज भागात हवेची, तर गुलमंडी, सिटी चौक, क्रांती चौक, सिडको वसाहत आणि उस्मानपुरा भागात ध्वनी प्रदूषणाची चाचणी घेतली जाते. सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालयात मंडळाच्या नॅशनल अॅम्बियंट एअर क्वालिटी मॉनिटरिंग स्टेशनमध्ये त्याची नोंद होते. येथील आकडेवारी अद्याप उपलब्ध झालेली नाही.

तरीही धोकादायकच
यंदा प्रदूषण कमी झाले ही समाधानाची बाब असली तरी एकाच दिवशी झालेले प्रदूषण ४ ते ५ पट अधिक आहे. कोर्टाची निवासी भागात फटाके विक्रीवर बंदी, शाळांत प्रदूषणमुक्त दिवाळीची शपथ देण्यात आली. त्याचा हा परिणाम म्हणता येईल.
- गीतांजली कौशिक, अभ्यासक, नवी दिल्ली
 
पुढील स्‍लाईडवर पहा दिवाळीतील ५ दिवसांत प्रदूषणाची आकडेवारी ... 
बातम्या आणखी आहेत...