आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"मनपा, जीटीएलच्या वादाचा ग्राहकांना भुर्दंड नको', ऊर्जा मंच करणार जनजागृती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- वीज बिलात एलबीटी आकारण्याबाबत मनपा, जीटीएलच्या वादात सामान्य नागरिकांना भुर्दंड बसायला नको यासाठी जनतेमध्ये जनजागृती करण्यात येणार असल्याचे संकल्प ऊर्जा मंचचे प्रमुख हेमंत कपाडिया यांनी पत्रकार परिषदेत सोडला.

वीज बिलात एलबीटी आकारण्याची पद्धत इतर राज्यात नाही. मात्र, शहरातील ग्राहकांना बिलात 2 टक्के एलबीटी भरावी लागत आहे. वीज दरात बदल करण्याचा अधिकार कंपन्यांना नाही. हे न्यायप्रविष्ट असल्याने रक्कम वसूल करणे बेकायदेशीर आहे. सध्या वीज दरात वीज शुल्क व विक्री कर हे दोनच कर लागू आहेत. नागपूर, जळगाव आणि भिवंडी या शहरांत फ्रँचायझी असतानाही वीज ग्राहकांच्या बिलात एलबीटी लावण्यात आलेली नाही, असे ते म्हणाले. पहिल्या टप्प्यात लोकप्रतिनिधींशी चर्चा करण्यात येईल. त्यानंतर न्यायालयीन लढाई लढली जाईल, असे ते म्हणाले. या वेळी सीएमआयचे प्रसाद कोकीळ, तनसुख झांबड, शरद चौबे उपस्थित होते.