आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारूवरील एलबीटी मनपाला देणार वर्षाला १८ ते २० कोटी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - वार्षिक ५० कोटींच्या आत उलाढाल असणाऱ्या मद्य विक्रेत्यांना एलबीटी लागू करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतल्याने मनपाच्या तिजोरीत वर्षाकाठी १८ ते २० कोटी रुपयांची भर पडणार आहे. आर्थिक संकटात असणाऱ्या मनपावरील ओझे यामुळे थोडेफार कमी होणार अाहे.
मद्य, सिगारेट यावर दहा टक्के एलबीटी आकारली जायची. या दोन्ही वस्तूंची बाजारपेठ मोठी असल्याने मनपाच्या तिजोरीतही खणखणीत भर पडायची. मागच्या चार वर्षांची आकडेवारी पाहिली, तर केवळ दारूवरील एलबीटीच्या रकमेची चढती कमानच दिसते. २०११- १२ मध्ये मनपाला कोटी ७८ लाख रुपये, २०१२-१३मध्ये १३ कोटी २२ लाख रुपये, २०१३-१४ मध्ये १३ कोटी ७५ लाख रुपये २०१४-१५ मध्ये १५ कोटी लाख रुपये एलबाटी दारूनेच दिली. नंतर राज्य सरकारने निवडणूक जाहीरनाम्यातील वचनाचे पालन करत एलबीटी रद्द केली आणि मनपाला या वाहत्या गंगेवर पाणी सोडावे लागले. सरकार सरासरी काढून दरमहा देत असलेल्या अनुदानावर मनपाला समाधान मानावे लागत होते.

दोन दिवसांपूर्वी राज्य सरकारने ५० कोटी रुपयांपेक्षा कमी उलाढाल असणाऱ्या दारू विक्रेत्यांना पुन्हा एलबीटी लागू करण्याचा निर्णय घेतल्याने मनपाला शहरातील देशी दारूची २३ दुकाने २२५ परमिट रूम विक्रेत्यांकडून दरसाल १८ ते २० कोटी रुपये उत्पन्न मिळणार आहेत. साधारणपणे महिन्याला दीड कोटी रुपयांची भर मनपाच्या तिजोरीत पडणार आहे, असे उपायुक्त अय्युब खान यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...