आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मनसेचे औरंगाबादेत फेरबदल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहराध्यक्षपदी सुमीत खांबेकर यांची निवड करण्यात आली आहे. विधिमंडळातील मनसेचे गटनेते आमदार बाळा नांदगावकर यांनी मंगळवारी (2 जुलै) सायंकाळी ही घोषणा केली. विभागाचे नेतृत्व तरुणांच्या हाती देण्यात आले आहे. जुन्या कार्यकारिणीतील कुठल्याही पदाधिकार्‍याला महत्त्वाचे पद देण्यात आलेले नाही. पूर्व विधानसभेच्या अध्यक्षपदी ज्ञानेश्वर डांगे, पश्चिम विपिन नाईक आणि मध्य विधानसभेच्या अध्यक्षपदी राजगौरव वानखेडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाने उच्चशिक्षितांना महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. गेल्या सहा महिन्यांत संपर्क अध्यक्ष गजानन काळे यांनी दिलेल्या अहवालानंतर या नावांचा विचार करण्यात आला आहे.

आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने औरंगाबाद शहराची जुनी कार्यकारिणी बरखास्त करून पक्षाचे नेते आमदार बाळा नांदगावकर आणि संपर्क अध्यक्ष गजानन काळे यांनी नवीन आणि तरुण तडफदार कार्यकर्त्यांवर पक्षाची धुरा सोपवली आहे.

शहर कार्यकारिणी : शहराध्यक्ष सुमीत खांबेकर, सचिव - सतनामसिंग गुलाटी, अरविंद धीवर, नारायण जाधव, आशिष सुरडकर, गजानन गौडापाटील, संतोष पाटील.

उपाध्यक्ष : गौतम आमराव विभागाध्यक्ष : ज्ञानेश्वर डांगे (पूर्व), बिपिन नाईक (पश्चिम), राजगौरव वानखेडे (मध्य). महिला आघाडी शहराध्यक्ष : लीला राजपूत, सचिव - मंजू देशमुख, मंगला ठोंबरे, ज्योती बोहरे, रूपाली पवार. उपाध्यक्ष : डॉ. सुनीता सोळुंके , विभागाध्यक्ष - अनिता लोमटे (पूर्व), मंगला राऊत. या सर्व नुतन पदाधिकार्‍यांचे मनसेच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून अभिनंदन केले आहे. पक्षाला अधिक गतिमान करण्यासाठी नुतन कार्यकारिणी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा ज्येष्ठांनी व्यक्त केली आहे.