आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Leaders Ignore Party Workers, Give Cadidature To Sister, Son

नेत्यांनी इच्छुक कार्यकर्त्यांना लाथाडले; काका, पुतण्यांसह आमदारांच्या बहिणीलाही मिळाली उमेदवारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - लोकसभा व विधानसभेत निवडून आणताना खस्ता खाणा-या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना लाथाडत युतीच्या नेत्यांनी स्वत:ची मुले, पुतणे, भाऊ-बहिणींच्या गळ्यात उमेदवारीच्या माळा घातल्या आहेत. यात खासदार चंद्रकांत खैरे, आमदार संजय शिरसाट आघाडीवर आहेत. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड रोष व्यक्त होत आहे. गुणवत्तेच्या निकषावर पदाधिका-याच्या आप्तेष्टास उमेदवारी दिली जाऊ शकते. त्याविषयी आमचा राग नाही. परंतु एकाच घरात पती-पत्नीला उमेदवारी देणे म्हणजे पदाचा गैरवापर नाही का, असा त्यांचा सवाल आहे.

मनपाची रणधुमाळी सुरू झाल्यानंतर विविध पक्षांचा घराणेशाहीचा चेहरा समोर येत आहे. पक्ष संघटनेसाठी वर्षानुवर्षे झिजणा-या कार्यकर्त्यास लाथाडल्याची भावना आहे. भारतीय जनता पार्टी याला अपवाद नाही. राष्ट्रवादी काँग्रेसनेही एका वॉर्डात हा प्रकार केला आहे.

भाजप : डॉ. भागवत कराड यांच्या पत्नी डॉ. अंजली कराड यांना कोटला कॉलनीतून नगरसेवक प्रशांत देसरडा यांना इंदिरानगर बायजीपुरा तर त्यांच्या पत्नी राखी यांना सुराणानगरमधून, भाजप शहराध्यक्ष भगवान घडामोडे यांच्या पत्नी सविता यांचा विठ्ठलनगर वॉर्ड राखीव झाला. घडामोडे यांनी तो शिवसेनेला सोडत शेजारचा रामनगर वॉर्ड स्वत:साठी सोडवून घेतला. उपमहापौर संजय जोशी यांनी मयूरबन कॉलनीतून पत्नीसाठी उमेदवारी मिळवली. आमदार नारायण कुचे यांची बहीण गंगाबाई बहुरे यांना तिकीट मिळाले.

शिवसेना : अनिता घोडेले यांना नक्षत्रवाडी येथून तर पती नंदू घोडेले यांना विटखेडा येथून खासदार खैरे यांचे पुत्र ऋषिकेश यांना समर्थनगर येथून, पुतणे सचिन सूर्यकांत खैरे यांना गुलमंडीतून, आमदार संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत यांना बन्सीलालनगर बनेवाडी येथून, एन ६ येथून वीरभद्र गादगे यांनी पत्नी शीतल, संजयनगर येथून संतोष जेजूरकर यांच्या पत्नी सुवर्णा यांना उमेदवारी दिली. बन्सीलाल गांगवे यांचे पुत्र मनोज यांना यांच्या पत्नी नगरसेविका विठ्ठलनगरमधून उमेदवारी दिली.

युती कागदावरच, प्रत्येक वाॅर्डात असंतुष्टांचे अर्ज
युती झाल्याने तिकीट न मिळालेल्या असंतुष्टांनी आपण अजूनही मैदानातच असल्याचे सांगत उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामुळे जवळपास सगळ्याच प्रमुख वाॅर्डांत असंतुष्टांची डोकेदुखी पक्षांना सहन करावी लागणार आहे. यात आपल्याच पक्षाविरुद्ध, मित्र पक्षाविरुद्ध अर्ज भरणारेही आहेत. यापैकी किती जण माघार घेतात याकडे लक्ष लागून राहिले आहे.