आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिकाऊ वाहन परवान्यासाठी महाविद्यालयांत शिबिर, परिवहन आयुक्तांचे निर्देश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- परिवहन कार्यालयामार्फत महाविद्यालयात जाऊन ऑनलाइन अर्ज भरणे शिकाऊ अनुज्ञप्ती (वाहन परवाना) देण्याची तरतूद करण्यात आली आहे. वर्षातून एक गरज भासल्यास आणखी एक अशी दोन शिबिरे घेण्याचे आदेश परिवहन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिले आहेत. मोटार वाहन कायद्याप्रमाणे परवाना घेऊनच वाहन चालवणे बंधनकारक आहे. पण तरुण विद्यार्थी याकडे कानाडोळा करतात. वाहन चालवताना काळजी घेतली जात नाही. नियमाचे उल्लंघन करून वाहन चालवल्यामुळे अपघात होतात. परवाना नसल्यामुळे विमा संरक्षणाचा लाभ मिळत नाही. उपचारासाठी मोठा खर्च होतो. 

विद्यार्थ्यांना परवाना घेऊनच वाहन चालवण्याची सवय लागण्यासाठी : काही चूक नसताना नियमबाह्य वाहन चालवून अपघात करणाऱ्या विरोधात दाद मागता येत नाही. असे अनेक तोटे होतात. यावर निर्बंध घालणे, विद्यार्थ्यांना परवाना घेऊनच वाहन चालवण्याची सवय जडावी, अपघातानंतर विमा संरक्षण मिळावे, अशी विविध उद्दिष्टे डोळ्यांसमोर ठेवून विद्यार्थ्यांना महाविद्यालयातच शिकाऊ वाहन परवाना देण्याची सुविधा परिवहन विभागामार्फत देऊ करण्यात आली आहे. त्याचा महाविद्यालय व्यवस्थापनाने लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नकाते यांनी केले आहे.
 
मान्यताप्राप्त महाविद्यालय असावे
शासकीयमान्यता असलेले महाविद्यालय असावे. १० संगणक, इंटरनेट जोडणी असावी. प्राचार्य स्टाफने विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज, शुल्क भरून द्यावे. इतर कुठल्याही व्यक्तीचा हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही. अर्ज कसा भरायचा याबाबत माहिती नसल्यास प्रशिक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. शिबिर नि:शुल्क घेतले जाणार असून शिबिराचे वेळापत्रक महाविद्यालय व्यवस्थापनाने आरटीओ विभागाला द्यायचे आहे. 
बातम्या आणखी आहेत...