आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीटंचाईमुळे वसतिगृहे सोडा, भीषण दुष्काळाचा मराठवाड्याच्या विद्यार्थ्यांवर संकट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मराठवाड्यातील भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने वसतिगृहे सोडा म्हणून विद्यार्थ्यांना २० एप्रिल रोजी नोटीस बजावली आहे. त्यामुळे २९ मे रोजी होणाऱ्या ‘सेट’ परीक्षेपूर्वीच विद्यार्थ्यांवर ‘बेसहारा’ होण्याचे संकट ओढवले आहे. वसतिगृहांतही भीषण पाणीटंचाई असून वार्षिक दुरुस्तीसाठी वसतिगृहे सोडावीच लागतील, अशी ठाम भूमिका विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. सुहास मोराळे यांनी घेतली.

तत्कालीन कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे यांनी २०१२-१३ मध्ये मराठवाड्यातील भीषण दुष्काळामुळे विद्यार्थ्यांनी गावाकडे जाऊच नये, अशी हाक दिली होती. सर्वांची निवासाची भोजनाची मोफत व्यवस्था वसतिगृहांतच करून मराठवाड्याच्या प्रश्नांसंदर्भात सहानुभूती दाखवली होती. त्यांच्या अशा निर्णयामुळे परीक्षा संपल्या तरीही विद्यार्थी दुष्काळामुळे गावाकडे गेलेच नव्हते. स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्रासह इतर विविध उपक्रम वसतिगृहांमध्ये राबवले होते. डॉ. पांढरीपांडे यांच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला होता.

दुरुस्ती कधी करणार?
वसतिगृहांची दुरुस्ती कधी करायची? प्लंबिंग, ड्रेनेज, प्लास्टर, फ्लोअरिंगची कामे तर करावीच लागणार आहेत. भावनिक मुद्दे करून वसतिगृहात राहण्याची प्रथा आपल्याला मोडावी लागणार आहे. प्रशासनाने योग्य निर्णय घेतला असून किमान परीक्षा नसलेल्या विद्यार्थ्यांनी वसतिगृहे सोडावीत. डॉ. सुहास मोराळे.