आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोदी सरकारच्या गती-प्रगतीचा लेखाजोखा आज मांडणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- गुजरातचे वादग्रस्त मुख्यमंत्री ते महाकाय लोकशाही असलेल्या भारताचे पंतप्रधान असा प्रवास केवळ बारा वर्षांत साध्य करणारे नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या गती-प्रगतीचा लेखाजोखा बुधवारी (२७ मे) औरंगाबादकरांपुढे सादर होणार आहे. मोदी यांचे निकटवर्तीय अशी ओळख असणारे राजकीय विश्लेषक, प्रख्यात स्तंभलेखक विनय सहस्रबुद्धे ही सूत्रे मांडणार आहेत. जालना रोडवरील महसूल प्रबोधिनी येथे सायंकाळी सात वाजता त्यांचे "अच्छे दिन : काही दृश्य, काही अदृश्य' या विषयावर व्याख्यान होणार आहे. त्यात हा लेखाजोखा ऐकण्याची संधी मिळणार आहे. व्याख्यानात ते मोदींच्या कार्यपद्धतीवर प्रकाशही टाकणार आहेत.
वाचकांनी दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे प्रचंड यशस्वी झालेल्या दैनिक ‘दिव्य मराठी’चा चौथा वर्धापन दिन २९ मे रोजी साजरा होत आहे. त्यानिमित्ताने आयोजित दिव्य मराठी उत्सवात सहस्रबुद्धे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. महसूल प्रबोधिनी सभागृह, शासकीय दूध डेअरीजवळ येथे सायंकाळी सात वाजता प्रख्यात उद्योजक राम भोगले यांच्या अध्यक्षतेखाली हे व्याख्यान होणार आहे. प्रवेश सर्वांसाठी खुला आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वाने प्रवेश दिला जाणार आहे. भाजपचे उपाध्यक्ष असलेले सहस्रबुद्धे रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे महासंचालक आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय म्हणूनही ते ओळखले जातात. त्यामुळे त्यांचे वक्तव्य, निरीक्षणांना आणि मतांना राजकीय, सामाजिक वर्तुळात अनन्यसाधारण महत्त्व आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे ६० वर्षांत काँग्रेस सरकारने कोणत्या समस्यांकडे दुर्लक्ष केले. समस्या कशा पद्धतीने वाढू दिल्या. त्या सोडवण्यासाठी मोदी सरकार काय करत आहे, भाजपच्या जाहीरनाम्याचे काय झाले, यावरही ते बोलणार आहेत. त्यांच्या या अभ्यासपूर्ण व्याख्यानाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
विनय सहस्रबुद्धे यांचे व्याख्यान
मोदी सरकारने एक वर्ष पूर्ण केल्यावर या वर्षभरातील कामगिरीचा लेखाजोखा प्रसारमाध्यमांतूून मांडला जात आहे. त्याचे काही नवीन पैलू सहस्रबुद्धे उलगडणार आहेत. मोदी सरकारने वर्षभरात सरकार नावाच्या संस्थेशी कोणत्या नव्या-जुन्या किंवा अत्यावश्यक गोष्टी जोडल्या, याची माहिती व्याख्यानातून मिळणार आहे. योजनांच्या अंमलबजावणीचा उरक कसा आहे, हेदेखील ते सांगणार आहेत.
- अच्छे दिन : काही दृश्य, काही अदृश्य विषयावर विनय सहस्रबुद्धे यांचे व्याख्यान
- स्थळ : महसूल प्रबोधिनी सभागृह, वेळ : सायं. 7 वाजता
बातम्या आणखी आहेत...