आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • LED Bulb Issue In Aurangabad Municipal Corporation

अखेर एलईडीची निविदा रद्द, जन हिताच्या निर्णयामुळे कोर्टाचा अवमान होणार नसल्याचे स्पष्टीकरण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- २०१४मधील दराने महागडे एलईडी घेण्यापेक्षा नवीन निविदा काढणे हिताचे असल्याने ११२ कोटींची एलईडीची निविदा रद्द करण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. मनपाची आर्थिक परिस्थिती विचारात घेऊन मनपा स्तरावरच एलईडी खरेदी करून गरज भासली तरच कंत्राटदारामार्फत खरेदी किंवा दुरुस्ती कामे करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे मनपाचे सुमारे ७० कोटी रुपये वाचू शकतील असा अधिकाऱ्यांचा दावा आहे.
स्थायी समितीच्या गुरुवारच्या बैठकीत निविदा रद्द करण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. न्यायालयीन घडामोडींनंतर या निविदेबाबत मनपात विचारमंथन सुरू होते. सध्याचे एलईडीचे दर ही निविदा काढली तेव्हाचे दर यात मोठा फरक असल्याने मनपाचे आर्थिक हित जपण्यासाठी आधी संबंधित ठेकेदारासोबत दर कमी करण्याबाबत चर्चाही केली. पण यश आल्याने मनपाने ही निविदाच रद्दचा निर्णय घेतला. हा निर्णय जनता मनपाच्या आर्थिक हिताचा असल्याने सुप्रीम कोर्टाचा अवमान होत नाही, असे विधी सल्लागारांचे मत आहे. तरीही मनपा दिवाणी अर्ज दाखल करून न्यायालयासमोर बाजू मांडेल, असे शहर अभियंता एस.डी. पानझडे यांनी सांगितले.
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, काय आहे एकूण प्रकरण... समिती आणि तिचे निष्कर्ष