आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Legislative Council Election Politics Aurangabad

विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी काँग्रेसमध्ये स्पर्धा सुरू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून या वेळी शहराध्यक्ष अँड. सय्यद अक्रम यांना उमेदवारी देण्यात यावी, असा प्रस्ताव काँग्रेस कार्यकारिणीने सोमवारी मंजूर केला. त्याची प्रत प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याकडे देण्यात आली. दुसरीकडे अक्रम यांना उमेदवारी म्हणजे आपल्यावर अतिक्रमण असल्याची भावना कार्यकर्त्यांजवळ व्यक्त करत प्रदेश सरचिटणीस अरुण मुगदिया, मनपातील माजी विरोधी पक्षनेते प्रमोद राठोड इच्छुकांच्या स्पर्धेत उतरले आहेत. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा नाहिदाबानो पठाण यांचे पती फिरोज पठाण यांनी सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

ही निवडणूक ऑगस्टअखेरीस किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. औरंगाबाद, जालना जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पक्षीय सदस्यांचे बळाबळ लक्षात घेता काँग्रेसचा उमेदवार येथून सहज विजयी होईल, असे चित्र आहे.

गतवेळेही म्हणजेच 2007 मध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीचे बळ शिवसेना-भाजपपेक्षा अधिक होते; परंतु सुभाष झांबड यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवल्याने शिवसेनेचे किशनचंद तनवाणी यांचा विजय झाला होता. या वेळी तिरंगी लढतीची चिन्हे नाहीत. त्यामुळे काँग्रेसकडून उमेदवारी म्हणजेच आमदार होणे, असे मानत काँग्रेसकडून इच्छुकांनी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.

प्रदेश सरचिटणीस अरुण मुगदिया यांनी वरिष्ठांकडे दोन महिन्यांपूर्वीच उमेदवारीची मागणी केली आहे. दुसरीकडे शहरातील आमदार तसेच शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या विरोधी गटातील अशी ओळख असलेले नगरसेवक प्रमोद राठोड यांनीही त्यांच्या नेत्यांमार्फत वरिष्ठांशी संपर्क साधला आहे. फिरोज पठाण यांच्यासाठी आमदार अब्दुल सत्तार गॉडफादर बनले आहेत.

या सार्‍या स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात अँड. अक्रम यांनी बाजी मारली आहे. त्यांनी स्वत:चा प्रस्ताव मंजूर करून घेतला आहे. लोकप्रिय आणि अजातशत्रू असल्यानेच अक्रम यांची शिफारस केली आहे. ते आमदार झाले तर पक्षाचा फार मोठा फायदा होणार आहे, असे शहर सरचिटणीस पवन डोंगरे यांनी सांगितले, तर उमेदवारीपेक्षा मतदारसंघ शिवसेनेकडून खेचणे महत्त्वाचे आहे, असे अँड. अक्रम म्हणाले