आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावकाराच्या घशात गेलेल्या जमिनी दोन शेतकऱ्यांना परत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शेतकऱ्यांचापैशासाठी छळ करून त्यांच्या जमिनी लाटणाऱ्या दोन सावकारांना औरंगाबादच्या सहकार खात्याने लगाम घातला आहे. सावकारांनी गिळकृंत केलेल्या दोन गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांना परत मिळवून देण्याचे सत्कर्म जिल्हा सहनिबंधकांनी केले आहे. अशा प्रकारे सावकाराने गिळंकृत केलेली जमीन परत करण्याची राज्यातील ही पहिलीच घटना असावी.
सहकार खात्याकडून खासगी नोंदणीकृत सावकारांच्या व्यवहारावर केवळ नजर ठेवण्याचे काम होते. याचाच फायदा घेत काही सावकार शेतकरी व्यापाऱ्यांना गंडवत होते. तक्रारीनंतर सावकारांच्या फर्मवर धाडी मारण्याचे अधिकार शासकीय अधिकाऱ्यांना नव्हते. मात्र, शासनाने जारी केलेल्या अध्यादेशानुसार आता थेट कारवाई करण्याचा अधिकार जिल्हा सहनिबंधकांना मिळाल्याने राज्यातील ही पहिली कारवाई औरंगाबाद कार्यालयाच्या नावावर नोंदवली गेली.
जिल्ह्यात सावकारांच्या विरोधात ११० तक्रारी औरंगाबादजिल्ह्यात सावकार छळ करीत असल्याच्या ११० तक्रारी सहकार खात्याकडे आल्या. यापैकी ३२ तक्रारींची चौकशी पूर्ण झाली, तर २६ सावकारांच्या पेढ्यांवर धाडी टाकल्या गेल्या. यात १० तक्रारींत तथ्य नसल्याचे आढळले. प्रकरणे न्यायालयात प्रलंबित असून प्रकरणांत दोघांनीही तडजोड केली. एका प्रकरणात सिल्लोड पोलिस ठाण्यात सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या ७७ प्रकरणांची चौकशी सुरू असून दोन शेतकऱ्यांना जमिनी परत करण्याचा निर्णय घेतला आहे.
तावडीतूनमुक्तता
*नवीनकायद्यानुसार कोणताही सावकार धमकावत असेल तर थेट गुन्हा दाखल करता येऊ शकतो. आमच्याकडे आलेल्या तक्रारीनंतर सुनावणी करून दोन शेतकऱ्यांना सावकाराच्या तावडीतून मुक्त करून जमिनी परत देण्याचा निर्णय दिला. नारायणआघाव, जिल्हासहनिबंधक, सहकार
अन् न्याय मिळाला
जिल्हाधिकाऱ्यांनीहा अर्ज सहायक निबंधक गंगापूर यांच्याकडे चौकशीसाठी पाठवला. त्यानंतर नासेर शेख यांची सुनावणी होऊन जाबजबाब झाले. यात मुलीच्या लग्नासाठी १३ हजार रुपयांचे कर्ज घेतल्याचे शेतकऱ्याने सांगितले. घेतलेल्या रकमेपोटी सावकाराने २५ हजार रुपये दोन टप्प्यांत वसूल केले. ही रक्कम बाबाराव सुसलादे माजी सरपंच यांच्या हाताने शेतकऱ्याने ती सावकाराला परत केली. त्यानंतर सतत मागणी करूनही सावकाराने गहाण ठेवलेली जमीन परत केली नाही. शेवटी सहकार सहनिबंधकांच्या बडग्यानंतर शेतकऱ्याला जमीन परत मिळाली.
गंगापूर तालुक्यातील डोमेगाव येथील शेतकरी शेख नासीर शेख हुसेन यांनी फेब्रुवारी २०१४ रोजी लोकशाही दिनात सावकाराच्या पाशातून मुक्त करण्याची तक्रार दाखल केली होती. यात सावकार शेतकरी यांच्यातील व्यवहाराची साक्षीदाराची मुद्देसूद माहिती होती. नसीर शेख यांनी सावकार दत्तात्रय माणिकराव लांडगे यांच्याकडून १३ हजार रुपये टक्के मासिक व्याजाने १९९८ मध्ये घेतले होते. केवळ तेरा हजारांच्या परतफेडीपोटी त्यांनी आजवर तब्बल ४० हजार रुपये कर्ज फेडले. तरीही ते कर्जमुक्त झाले नाहीत. पुढे सावकाराने शेतकऱ्याच्या मालकीची एक एकर जमीन गहाण म्हणून घेतली होती.