आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुलताबाद येथील शेतात सापडले बिबट्याचे नवजात पिल्लू, औरंगाबादला रवानगी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खुलताबाद (औरंगाबाद) - खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव येथे एका शेतामध्ये 3 ते 4 दिवस वय असलेल्या बिबट्याचे पिल्लू आढळून आले आहे. येथील शेतकरी भगवान शिवाजी चव्हाण यांना आपल्या शेतात रविवारी हे पिल्लू दिसून आले. स्थानिक शेतकरी गुड्डु खोसरे यांनी खुलताबाद वनपरिक्षेत्राशी संपर्क साधून यासंदर्भातील माहिती दिली. यानंतर खुलताबाद वनपरिक्षेत्र अधिकारी सुधाकर गवंडर यांच्या मार्गदर्शनाखाली नियतक्षेत्र अधिकारी के.आर. जाधव यांनी हे पिल्लू ताब्यात घेवून औरंगाबादला रवाना केले.
बातम्या आणखी आहेत...