आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Leopard Fled From Forest Department Cage In Aurangabad

औरंगाबादमध्‍ये पिंजरा तोडून बिबट्या पळाला, शहरात घबराट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - गंगापूर परिसरातील जामगाव परिसरात मंगळवारी पकडलेल्या बिबट्याने वन विभागाच्या स्टेशन रोडवरील कार्यालयातून बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास पळ काढल्याने परिसरात दहशत निर्माण झाली आहे. स्नेहनगर भागातील वन विभागाच्या झाडीत बिबट्या दडून बसल्याने उस्मानपुरा, कोकणवाडी कोटला कॉलनी क्वार्टर्स, क्रांतीनगर भागात कमालीची दहशत आहे. पोलिस व वन अधिकार्‍यांचा दीडशे जणांचा फौजफाटा बिबट्याला पकडण्यासाठी रात्री उशिरापर्यंत प्रयत्नांची शर्थ करत होता. सहा बंदूकधारीही तैनात करण्यात आले होते.


मटण टाकले, कुत्र्यांनीच खाल्ले
बिबट्याचे आवडते खाद्य म्हणून परिसरात पाच ते सहा कुत्री सोडली गेली. रोपवाटिकेच्या परिसरात ठिकठिकाणी 10 किलो मटणही टाकण्यात आले. परंतु कुत्र्यांनीच ते फस्त केले. बांबूच्या जाळीत बिबट्या दडून बसला होता.

दीडशे कर्मचार्‍यांचा फौजफाटा मागावर
बिबट्याला पकडण्यासाठी दीडशे कर्मचार्‍यांचा फौजफाटा मागावर होता. काठ्या, जाळे, हेल्मेटधारी कर्मचारी तैनात होते. रोपवाटिकेच्या भागात बिबट्याच्या पंजाचे ठसे आढळून आले, परंतु बिबट्या मात्र गुंगारा देत होता.