आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ए. एस. क्लबजवळ बिबट्याने ओलांडला रस्ता, तिघांना घडले दर्शन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- आैरंगाबाद-पुणेमहामार्गावर ए. एस. क्लबनजीक शुक्रवारी बिबट्याचे दर्शन झाले. कारमधून आैरंगाबादकडे येणाऱ्या तिघांना सिडको महानगराजवळील वसाहतीकडे जाताना बिबट्या आढळला. शहरात येताना उजव्या बाजूच्या उसाच्या शेताकडून धावत आलेला बिबट्या रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या सिडको महानगरातील वसाहतीच्या दिशेने गेल्याचे तिघांनी सांगितले.
पंकज जैस्वाल, विष्णू मुळे पंकज भाले हे तिघे शुक्रवारी रात्री वाजेच्या सुमारास वाळूजजवळील पंढरपूरहून शहरात येत होते. ए. एस. क्लबपूर्वी सिडको महानगराचे प्रवेशद्वार येण्यापूर्वी दोनशे मीटरवर त्यांची कार असताना बिबट्याने केवळ अाठ ते दहा फूट अंतर असतानाच कारसमोरून महामार्ग आेलांडला, असे तिघांनी सांगितले. या घटनेची माहिती पंकज जैस्वाल यांनी पोलिसांनाही दिली आहे. यापूर्वीही कर्णपुरा परिसरातून वन विभागाने बिबट्यास जेरबंद केले होते. परिसरात मोठी वसाहत असल्याने बिबट्या नेमका कुठे जाईल हे सांगता येत नाही. परिसरात नदी-नाले काही भागात उसाचे पीक आहे. सिडको महानगर ही मोठी वसाहत आहे. तिसगाव, वडगाव कोल्हाटी, गोलवाडी आदी गावे या परिसरात आहेत.